सोनिया गांधींची सोमवारी पुन्हा ईडीची चौकशी होणार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- सोनिया गांधींची ईडी चौकशी संपली असून ही चौकशी साधारण तीन तास चालली आहे. दुपारी बाराच्या सुमारास त्या ईडी कार्यालयात दाखल झाल्या होत्या. त्यांतर त्यांना सोमवारी पुन्हा चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे.
तीन टप्प्यात त्यांची चौकशी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. पहिल्या टप्प्यात त्यांच्या वैयक्तिक व्यवहाराची चौकशी केली जाणार असून आज त्यांच्यासोबत प्रियांका गांधी सुद्धा उपस्थित होत्या. दरम्यान आज काँग्रेसकडून देशभर निदर्शने करण्यात आली आहेत. आंदोलनादरम्यान काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

सोनिया गांधी यांच्या चौकशीनंतर काँग्रेस आणि भाजप नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रात्यारोप चालू झाले आहेत. भाजपचे रविशंकर प्रसाद यांनी हा सत्याग्रह नसून दुराग्रह असल्याची टीका काँग्रेसवर केली आहे.
काँग्रेसच्या नेत्यांना अपमानित करण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात येत आहे. त्याचबरोबर हा राजकीय सूडाचा भाग आहे असं म्हणत यूपीएचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांनी ईडीच्या या प्रवृत्तीचा जाहीर निषेध केला आहे. त्यानंतर काँग्रेसकडून देशभरात आंदोलने केली जात आहेत. हा सत्याग्रह असल्याचं काँग्रेसच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. तर हा सत्याग्रह नसून दुराग्रह आहे असा आरोप भाजपच्या नेत्यांकडून केला जात आहे. त्याचबरोबर काँग्रेस पक्षाची सर्व संपत्ती ही गांधी घराण्याच्या खिशात असल्याचा आरोप भाजपचे रविशंकर प्रसाद यांच्याकडून केला जात आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…