मंत्रिमंडळ विस्तारात अडचण नाही :- फडणवीस ; आता 22 जुलै नवा मुहूर्त ; शिंदे गटासाठी डोकेदुखी..!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- सर्वोच्च न्यायालयात राज्यातील राजकीय घडामोडींवर निकाल यायचा आहे म्हणून आमचा मंत्रिमंडळ विस्तार थांबलेला नाही.
पुढील काही दिवसांत विस्तार नक्कीच केला जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी स्पष्ट केले.
सर्वोच्च न्यायालयाने ‘जैसे थे’ स्थिती ठेवण्याचे आदेश दिल्याने आता मंत्रिमंडळ विस्तारातही अडचणी येतील, असा दावा विरोधकांकडून केला जात असताना फडणवीस यांनी तो फेटाळून लावला.
पहिल्या टप्प्यात ८ – ५ वाटप
पहिल्या टप्प्यात भाजपच्या ८, तर शिंदेंच्या ५ जणांचा समावेश होऊ शकतो. तथापि, एवढेच मंत्री केल्यास मोठा असंतोष समोर येऊ शकतो, म्हणून २५हून अधिक मंत्र्यांना पहिल्या टप्प्यात शपथ द्यावी असाही विचार सुरू आहे. विस्ताराचा आता २२ जुलै हा नवा मुहूर्त सांगितला जात आहे.
शिंदे गटासाठी डोकेदुखी..!
पहिल्या टप्प्यात पाच मंत्री करायचे तर कोणाकोणाला संधी द्यायची, ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी डोकेदुखी आहे. आधी मंत्री असलेल्या सर्वांना पहिल्या टप्प्यात न घेता आधीचे मंत्री आणि नवीन अशा दोघांनाही संधी द्यावी, असा आतापर्यंत मंत्रिपद न मिळालेल्यांचा आग्रह असल्याचे समजते. आधीच्या सरकारमधील मंत्री असलेले बरेच जण बंडानंतर काही दिवसांनी शिंदे गटात सहभागी झाले होते. आम्ही आमदारांनी मात्र राजकीय भवितव्याची चिंता न करता सुरुवातीलाच आपल्याला साथ दिली, त्यामुळे मंत्रिपदासाठी आधी आमचा विचार करा, असा आमदारांचा आग्रह असल्याची माहिती आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…