महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री दिल्ली दरबारी वेटिंगवरच ; वीस तासानंतरही पंतप्रधान यांचे मुखदर्शन नाहीच…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- खासदारांचा फुटीर गट स्थापन करून त्याला मान्यता मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रात अतिवृष्टी सुरू असताना राज्य वाऱयावर सोडून दिल्लीत आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्लीश्वरांनी चांगलाच पोपट केला.
तब्बल वीस तासांनंतरही मुख्यमंत्र्यांना पंतप्रधानांचे साधे मुखदर्शनदेखील झाले नाही. मुख्यमंत्री शिंदे नवीन महाराष्ट्र सदनात वेटिंगवरच लटकून पडले.
मुख्यमंत्री शिंदे सोमवारी रात्री 12 वाजता दिल्लीत पोहचले. खासदारांच्या नव्या गटाला मान्यता हा या भेटीमागचा अजेंडा होता. त्यानंतरच पंतप्रधान व इतर वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी होणार होत्या. प्रत्यक्षात मुख्यमंत्री शिंदे यांना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीच तंगवले. शिवसेनेतील फुटीर गटाच्या मागणीचे पत्र चुकीचे आहे, प्रतोदाची सही घेऊन या असे ओम बिर्ला यांनी फटकारल्यानंतर फुटीर खासदारांना मार्गदर्शन करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे त्यांचे खासदार चिरंजीव श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी पोहचले. चूक दुरुस्त करून पुन्हा लोकसभा अध्यक्षांची फुटीर खासदारांनी भेट घेतली. तब्बल वीसेक तासांनंतर मुख्यमंत्र्यांना पत्रकार परिषद घेण्याची संधी मिळाली.
वेटिंग वेटिंग वेटिंग….
दरम्यानच्या काळात मुख्यमंत्र्यांच्या वतीने भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटींसाठी सातत्याने संपर्क केला जात होता, मात्र प्रत्येक ठिकाणाहून नकारघंटा वाजत होती. थांबा, सबर करो, वेट असे निरोप देत दिल्लीश्वरांनी मुख्यमंत्री शिंदे यांना चांगलाच हिसका दाखवला. राज्यातील काही नेते आणि भेटायला येणारे अभ्यागत यांच्यासोबत यथेच्छ फोटो घेत वेटिंगवरच्या मुख्यमंत्र्यांनी आपला वेळ सत्कारणी लावला.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…