पुस नदीचे पुलावर फुटभर पाणी ; तर नागझरी नाला फुल्ल , वाहतूक विस्कळित ; अपघाताची शक्यता ; उपाययोजना शून्य
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :
तालुक्यात सकाळ पासून मुसळधार पाऊस सुरू आहे.तर मागील दोन दिवसापासून रिमझिम पाऊस सुरू असल्याने पुस नदीच्या पुलाची अवस्था बकाल झाली आहे.पुस नदीच्या बंधाऱ्यावर पावसाचे पाणी पोहचले आहे.मात्र पुस नदी तुडुंब भरण्यापूर्वीच फुटभर पाणी साचले आहे.तरीही वाहतूक सुरू असल्याने अपघाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
(पुस नदीच्या पुलावर साचलेल्या फुटभर पाण्याचा व्हिडिओ )
शंभर वर्ष पूर्ण करण्याच्या दिशेने असलेल्या महागाव शहराच्या काठावर वसलेल्या पुस नदीच्या पुलाची अवस्था अत्यंत गंभीर झाली आहे.मोठ मोठे खड्डे पडल्याने मुसळधार पावसाचे पाणी त्यामध्ये साचत आहे.तर साचलेल्या पाण्यामुळे पूल खाचण्याच्या मार्गावर आहे.मात्र सध्याच्या स्थितीत पुस नदी पुलावर फुटभर पाणी साचले आहे.वाहतूक सुरू असल्याने भरधाव वाहन साचलेल्या पाण्याच्या खड्यातून उसळी घेवून पुलाखाली कोसळण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे.महागाव तहसील प्रशासनाच्या आपत्ती विभाग मात्र मशगुल असल्याने तालुक्यात चिंता व्यक्त केल्या जात आहे.
(महागाव : नागझरी नाल्याला आलेली पुर स्थिती )
उमरखेड रोडवर नागझरी नावाने ओळखल्या जाणाऱ्या नाल्याला मोठा पूर आला आहे.त्यामुळे पुलाचे पाणी रोडवर असलेल्या दुकानात शिरत आहे.