कॉग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्क्ष राज बब्बर यांना दोन वर्षाची शिक्षा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेते आणि कॉग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्क्ष राज बब्बर यांना एम पी – एमएलए कोर्टानं दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यांना शिक्षा झाल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होताच वेगळ्या चर्चेला तोंड फुटले आहे.
मतदान केंद्रामध्ये जाऊन मतदारांची दिशाभूल करणे आणि पोलिंग एजंटशी वाद घातल्याप्रकरणी त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. राज बब्बर यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. त्यानंतर केलेल्या कारवाईमध्ये न्यायालयानं त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
वजीरगंज पोलीस ठाण्यामध्ये राज बब्बर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बॉलीवूडमध्ये आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीतील अभिनयानं राज यांनी प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. त्यानंतर त्यांनी राजकारणामध्ये उडी घेत लोकप्रियता मिळवली. कॉग्रेसचे निष्ठावान नेते अशीही त्यांची ओळख आहे. दिल्लीच्या राजकारणात महत्वाचे स्थान असणाऱ्या राज बब्बर यांचा राजकीय प्रवास देखील मोठा आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ते बॉलीवूडपासून लांब असले तरी बॉलीवूडच्या महत्वाच्या सोहळ्यांना त्यांची उपस्थिती दिसून आली आहे.
एमपी एमएलए कोर्टानं राज यांना दोन वर्षांची शिक्षा आणि साडेसहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. हे प्रकरण 2 मे 1996 मधील वजीरगंज येथील आहे. याप्रकरणात मतदान अधिकारी श्रीकृष्ण सिंह राणा यांनी राज बब्बर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. यावेळी केवळ राजच नव्हे तर अरविंद यादव यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. राज बब्बर यांनी मतदान अधिकारी यांचे नियम आणि आदेश धुडकावून लावत मतदान केंद्रात प्रवेश केला. आणि मतदारांची दिशाभूल केली. असा आरोप त्यांच्यावर होता.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…