रुई सेवा सह. सोसायटीच्या अध्यक्ष पदी आनंदराव कलाने तर उपाध्यक्ष पदी दतात्रेय भेणे बिनविरोध….!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
राजकिरण देशमुख
माहूर :- माहूर तालुक्यातील सेवा सह रुईची निवडणूक दि.४ जुलै २०२२ रोजी पार पडली त्यामध्ये अध्यक्ष पदी आनंदराव कलाने तर उपाध्यक्ष पदी दतात्रेय भेणे बिनविरोध ! तर संचालक पदावर गुमानसिंग चुंगडे, नागोराव सुर्वे, दत्तात्रेय जासूद, उत्तमराव सुकळकर, वाघुजी पठाडे, नारायण मानतुटे, अरविंद शिंदे, छतनसिंग चुंगडे, सुनेराबी काजी, जिजाबाई चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली, निवडणूक निर्णय अधिकारी बामणे यांनी कामकाज चालविले तर गटसचिव एस.बि वांगे यांनी सहकार्य केले. या निवडीबद्दल ना.जि. म.स. बँकेचे संचालक नगरसेवक राजेंद्र केशवे, युवक कॉंग्रेस वैद्यकीय सहाय्यता आघाडीचे राज्य समन्वयक डॉ निरंजन केशवे, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष संजय राठोड, कॉंग्रेस तालुका प्रवक्ते जयकुमार अडकीने, नगरसेवक प्रा. विलास भंडारे, कॉंग्रेस शहराध्यक्ष आनंद तुपदाळे, युवक कॉंग्रेस विधानसभा अध्यक्ष अमोल केशवे, राजु सौंदलकर, राजकिरण देशमुख आदीसह ग्रामस्थ व शेतकरी यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष व संचालक मंडळाचे अभिनंदन केले.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…