मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शरद पवारांची घेतली भेट ; चर्चांना उधाण…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. पवार यांच्या ‘सिल्वर ओक’ या निवासस्थानी ही भेट झाली.
आपण लवकरच राज्यातील पक्षनेते आणि ज्येष्ठ नेत्यांच्या भेटी घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितले होते. त्यानुसार मुख्यमंत्र्यांची पवारांनी घेतलेली ही सदिच्छा भेट होती.
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शिंदे यांच्या फौजेमध्ये महाराजांची संख्या अधिक आहे. त्यामुळे हे सरकार उर्वरित कालावधी पूर्ण करणार नाही. मध्यावधीच्या तयारीला लागा, असे आदेश पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना दिले होते. पवारांच्या ‘या’ वक्तव्यावर शिंदे नाराज असतील, अशी शक्यता असताना त्यांनी अचानक घेतलेल्या ‘या’ भेटीबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
मनसे नेते राज ठाकरे यांचीही ते भेट घेणार आहेत. आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीसुद्धा ते भेट घेतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….