राज्यात ५ दिवस मुसळधार पावसाच्या इशारा ; या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- भारतीय हवामान विभागाने राज्यात पुढील ५ दिवस सर्वत्र पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे, प्रशासनाला कोणत्याही आपत्तीला तोंड देण्यासाठी सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे.
आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, पुणे जिल्ह्यातील घाट भागात आजपासून 9 जुलैपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
पुढचे ४, ५ दिवस राज्यात सर्वदूर पसरलेल्या पावसाची शक्यता असून कोकण, गोवा आणि लगतच्या मध्य महाराष्ट्रासाठी अतिमुसळधार पावसासह जोरदार ते अति मुसळधार पावसाचे इशारे देण्यात आले आहेत. सातारा, पुणे, नाशिक घाट परिसरात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

आयएमडीने दिलेल्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना खबरदारी घेण्याचे आणि जीवित किंवा वित्तहानी होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत. एनडीआरएफच्या पुणेस्थित बटालियनच्या दोन तुकड्याही कोल्हापुरात तैनात आहेत.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….