शिवसेनेचा आणखी एक आमदार शिंदे गटात…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एकामागोमाग एक धक्के बसत आहेत. विधानभवनात अध्यक्षपदाची निवडणूक शिंदे गट आणि भाजपानं जिंकल्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बहुमत चाचणीला सामोरे जाणार आहेत.
यातच काल रात्री नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे हेच शिवसेना विधीमंडळ पक्षाचे गटनेते असल्याचं मान्य केल्याचं पत्र जारी केलं. तसंच शिवसेनेकडून प्रतोदपदी नेमण्यात आलेल्या अजय चौधरी यांची निवड रद्द केली आणि शिंदे गटातील भरत गोगावले यांची निवड योग्य ठरवली आहे. यातच आज सकाळी शिवसेनेचा आणखी एक आमदार शिंदे गटात सामील झाला आहे.
हिंगोली मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर आता शिंदे गटात सामील झाले आहे. संतोष बांगर अगदी कालपर्यंत उद्धव ठाकरेंच्या बाजूनं होतं. त्यांनी काल शिंदे गटाच्या विरोधात मतदान केलं होतं. पण आज सकाळी ते ट्रायडंट हॉटेलमधून शिंदे गटाच्या बसमध्ये उपस्थित असल्याचं दिसून आलं आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काल रात्री उशिरा संतोष बांगर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर संतोष बांगर यांनी शिंदे गटासोबत येण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं जात आहे.
संतोष बांगर आता शिंदे गटात सामील झाल्यामुळे शिंदे समर्थक गटातील शिवसेना आमदारांची संख्या आता ४० वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे, याच संतोष बांगर यांनी शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर आपण कायमस्वरुपी उद्धव ठाकरेंच्याच पाठिशी उभं राहणार असल्याचं सांगत मतदार संघात जाऊन जोरदार भाषण केलं होतं. तसंच मतदार संघातील शिवसैनिकांना संबोधित करताना त्यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांना परतण्याचं आवाहन केलं होतं. त्यावेळी ते भावूकही झाले होते.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….