अमरावती हत्याकांडात मोठा खुलासा ; उमेशच्या हत्येत मित्राचा हात ; अंत्यसंस्कारातही सहभागी झाला होता….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अमरावती :- नुपूर शर्माच्या समर्थनार्थ कथित पोस्ट शेअर केल्याप्रकरणी अमरावती येथील उमेश कोल्हे हत्याकांडातील मुख्य आरोपीसह आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे.
कोल्हे यांचा 6 आरोपींनी गळा चिरून खून केला होता. या हत्याकांडात एकापाठोपाठ एक मोठे खुलासे होत आहेत. आता मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, मृत उमेश कोल्हे याच्या हत्येत त्याचा जवळचा मित्र डॉ. युसूफ खान याचाही सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे..
अंत्यसंस्कारातही सहभागी झाला
उमेश कोल्हे यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार त्यांच्या गळ्यावर 5 इंच रुंद, 7 इंच लांब आणि 5 इंच खोल जखमा आढळून आल्या. चाकूने मेंदूच्या मज्जातंतूला इजा झाल्याचे अहवालात पुढे म्हटले आहे. यासोबतच श्वासोच्छवासाची नळी, अन्नाची नळी आणि डोळ्याच्या नसांनाही मोठी इजा झाली आहे. विशेष म्हणजे, कुणालाही संशय येऊ नये म्हणून आरोपी युसूफ उमेशच्या अंत्यसंस्कारात आला होता.
व्हॅट्सअॅपवर शेअर केली पोस्ट
युसूफ खान हा ‘ब्लॅक फ्रीडम’ नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपचा सदस्य आहे. या ग्रुपमध्ये उमेशने नुपूर शर्माला सपोर्ट करणारी पोस्ट फॉरवर्ड केली होती. त्यानंतर युसूफ खानने ती पोस्ट ‘रहबरिया ग्रुप’ला पाठवली. त्या ग्रुपमध्ये हत्याकांडातील मास्टरमाइंडही होता. कोल्हे यांची ती पोस्ट पाहून चिडलेल्या आरोपीने 16 जून रोजी साथीदारांसोबत बैठक घेतली आणि उमेशच्या हत्येचा कट रचला. यानंतर कोल्हे यांची निर्घृण हत्या करण्यात आली.
एनजीओला पाकिस्तानी फंडिंग
एनआयएच्या एफआयआरमध्ये आरोप करण्यात आला आहे की, ही हत्या एका वर्गाला धमकावण्याचा प्रयत्न आहे. इरफान रायबर हेल्पलाइन नावाची एनजीओ चालवतो आणि जवळपास 21 लोक त्याच्याशी संबंधित असल्याचेही तपासात समोर आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्येतील इतर आरोपीही याच एनजीओशी संबंधित आहेत. या एनजीओला काही आखाती देश आणि पाकिस्तानमधून निधी मिळत असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे.
मास्टरमाइंडसह सर्व 6 आरोपींना अटक
उमेशचा मुलगा संकेत कोल्हे याने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी मुदस्सीर अहमद उर्फ सोनू रजा वल्द शेख ईब्राहिम (22), अब्दुल तौफिक उर्फ नानू शेख तसलीम (24), शाहरूख पठाण उर्फ बादशाह हिदायत खान (25), शोएब खान उर्फ भुऱ्या वल्द साबीर खान (22), अतिब रशीद वल्द आदील रशीद (22) आणि युसूफ खान बहादूर खान (44) यांना अटक केली आहे. या आरोपींना कोर्टात हजर केले असता त्यांना कोर्टाने 4 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….