शिवसेनेची मोठी खेळी ; शिंदे गट विधानभवनात पोहोचण्याआधीच कार्यालयाचे “दार” केले बंद….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई, 03 जुलै :- एकनाथ शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर आता विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आज होणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना आणि बंडखोर आमदार आमनेसामने येणार आहे.
याच पार्श्वभूमीवर शिवसेनेनं आता विधानभवनातील शिवसेनेचे (shivsena) कार्यालय बंद करण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून महाविकास आघाडी सरकार पाडले. या बंडखोरी नाट्यानंतर पहिल्यांदाच शिवसेना आमदार आणि बंडखोर आमदार आमनेसामने येणार आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना विधिमंडळ पक्षाचे विधानभवनातील कार्यालय बंद करण्यात आले आहे.
उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटामध्ये सुरू असलेल्या मतभेदांमध्ये हे कार्यालय बंद करण्यात आलं आहे. ती कोणाच्या सांगण्यावरून बंद करण्यात आली आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण, शिंदे गटाकडून कार्यालयावर ताबा मिळवण्याची शक्यता होती. त्यामुळे शिवसेनेनं हे कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान,राज्यपालांनी बोलावलेल्या विशेष अधिवेशनात आज विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेनं आधीच व्हीप बजावला आहे. तर दुसरीकडे शिंदे गटानेही व्हीप बजावला आहे.
या व्हीपमध्ये भाजपचे नेते राहुल नार्वेकर हे शिवसेना आणि भाजपचे अधिकृत उमेदवार असणार आहे. तसंच 2 तारखेला ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये बैठक झाली, या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजूनही पक्षादेश पत्रावर गटनेते म्हणून नमुद आहे. तर आमदारांनी प्रतोद म्हणून नियुक्त केले होते भरत गोगावले यांचेही पक्षादेशावर नाव आहे.
या पत्राद्वारे एकनाथ शिंदे गटाने पुन्हा एकदा शिवसेना पक्ष त्यांचाच असल्याचा दावा केला आहे. तर महाविकास आघाडीकडूनही व्हीप बजावण्यात आला आहे. शिवसेनेनं प्रतोद सुनील प्रभू यांनी व्हीप जारी केला असून शिंदे गटातील बंडखोर आमदारांनाही तो लागू असणार आहे. मात्र, आमच्याकडे पुरेस संख्याबळ आहे. त्यामुळे आम्हाला शिवसेनेला व्हीप लागू होणार नाही, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…