एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडवणीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिवसेना नेते एकनाथ शिदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तसेच, भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. गुरूवारी संध्याकाळी राजभवनात शपथविधीचा सोहळा पार पडला.
त्यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दोघांना पदाची आणि गोपनियतेची शपथ दिली.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर आज एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. शिंदे यांच्या शपथविधीला खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह संपूर्ण शिंदे कुटुंब उपस्थित होते. तसेच, भाजपा नेते आशिष शेलार उपस्थित होते.
बंड पुकारल्यानंतर एकनाथ शिंदे आज गोव्याहून मुंबईत दाखल झाले. मुंबईत आल्यावर त्यांनी सागर निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र राजभवनात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा केली. तसेच या नव्या मंत्रीमंडळात आपण सहभागी होणार नसून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करू असे त्यांनी म्हटले होते. मात्र, भाजपच्या नेतृत्वाने फडणवीस यांनीही मंत्रिमंडळात सहभागी व्हावे, अशी सूचना केली. तसे ट्विटही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी केले आहे. त्यानुसार फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. यावरून भाजपातच मतभेद असल्याचे समोर आले आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….