गुवाहाटीतून 40 आमदारांचे मृतदेह येतील ; संजय राऊतांचे खळबळजनक विधान…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- ज्याने बाळासाहेब ठाकरेंची गद्दारी केली, तो संपला, बाळासाहेबांचे श्राप लागले. एका बापाचे असाल तर ४० जणांनी राजीनामा द्या निवडणुकीला सामोर जा. शिवसेनेला बंड नवीन नाही. गुलाब पाटलांची भाषण पाहिली तर शिवसेनेत हाच असं दिसला.
तुझ्या मायला ढुंगणाला पाय लावून पळाला. पुन्हा तुला पानटपरीवर बसवू. माझा शब्द कधी खोटा ठरणार नाही असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.
संजय राऊत म्हणाले की, संदीपान भुमरे हा वॉचमेन होता, त्याला मुंबई माहिती नव्हती. हॉटेलमध्ये वडा सांबार खाता येत नव्हता. आज त्याला मंत्री बनवले. शिवसेनेमुळे मी मंत्री झालो असे अश्रू उद्धव ठाकरे आणि माझ्यासमोर म्हटलं. हे अश्रू मगरीचे होते. गुवाहाटीचे हॉटेल म्हणजे बिग बॉसचं घर. महाराष्ट्रात खरा बिग बॉस हा बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे आहेत. प्रकाश सुर्वे भाजी विकत होता त्याला पुन्हा भाजी विकायला लावू असंही त्यांनी सांगितले.
तसेच मी हे संकट मानत नाही. शिवसेना ताकदीने पुढे नेऊ. यापुढे कोणावर विश्वास ठेवायचा आणि कुणाच्या पालख्या वाहायच्या हे आपल्याला ठरवावं लागेल. प्रकाश सुर्वे पुन्हा विधानसभेत दिसणार नाही. ४० आमदारांचे मृतदेह गुवाहाटीतून येतील त्यांना थेट शवागृहात पोस्टमोर्टमसाठी पाठवू. कामाख्या देवीसाठी ४० रेडे पाठवले आहेत. बळी द्या असं खळबळजनक विधान संजय राऊत यांनी दहिसर येथील शिवसेनेच्या मेळाव्यात केले आहे.
किरीट सोमय्या बेरोजगार झाले – राऊत
किरीट सोमय्यांचे नवल वाटतो. तो बेरोजगार झाला. प्रताप सरनाईक दिल्लीला गेले. गेले अनेक दिवस तुरुंगात पाठवणार असं बोलत होते. अशी कुठली वॉशिंग मशीन होती हजारो कोटीच्या भ्रष्टाचाराची केस साफ झाली. सूरतहून थेट गुवाहाटीला गेले. ही कुठल्या ब्रॅँडची वॉशिंग मशीन आहे. माझ्यावरही ईडीची कारवाई झाली. राहतं घर जप्त केले. मालमत्ता जप्त झाली परंतु मी गुडघे टेकले नाही असंही संजय राऊत म्हणाले. मला अटक करा, मला अटक करण्याचे आजही प्रयत्न आहे. बाळासाहेब ठाकरे गटाचे नाव सांगत नाही तर मूळ बाळासाहेब ठाकरेंचे नाव सांगतो असा इशारा संजय राऊतांनी भाजपाला दिला.
त्याचसोबत शरीर वाघाचं आणि काळीज उंदराचं हे गुलाबराव पाटील आहे. महानगरपालिका प्रचंड बहुमताने जिंकलो तर हे ४० चोर, रेडे कायमचे मातीत गाडले जातील. शिवसेनेत ही कीड कायमची संपून जाईल. अनेकांना शिवसेनेने खूप काही दिले. परंतु आता यापुढे होणार नाही. हे लोक कुठून येतात त्यांना पक्षात का आणलं जाते हे सगळं मी उद्धव ठाकरेंना सांगेन, आता फक्त शिवसैनिक आणि भगवा आहे. बंडखोरांनी एकमेकांचे कपडे फाडले. बंडखोर हे चड्डी बनियन टोळी झाली आहे. ही बाळासाहेबांची शिवसेना, ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सांगणारी शिवसेना आहे. मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठीची शिवसेना ती कुणालाही नष्ट करता येणार नाही असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….