मोठी बातमी ; शिंदे गटातील २० ते २५ बंडखोर आमदारांमध्ये मतभेद…? ; बंडखोर आमदार “मातोश्री” च्या संपर्कात…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत सध्या गुवाहाटीत असणाऱ्या आमदारांमध्येच मतभेद झाल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.
एकनाथ शिंदे यांच्याकडे जवळपास ५० आमदारांचे सख्याबळ आहे. मात्र, सत्तास्थापनेसाठी बंडखोर आमदारांचा स्वतंत्र गट कायद्यात बसत नाही. त्यासाठी बंडखोर आमदारांना कोणत्यातरी पक्षात विलीन व्हावच़ लागेल अशी अट आहे.
परंतू दुसऱ्या पक्षात जाण्यावरून २० ते २५ बंडखोर आमदारांमध्ये मतभेद असल्याने हे बंडखोर आमदार पुन्हा मातोश्रीच्या संपर्कात असून, उद्धव ठाकरेंशी मध्यस्थी करण्यासाठी त्यांनी सेनेच्या अनेक बड्या नेत्यांना फोन केल्याची माहिती देखील विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.
दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सकाळी माध्यमांशी संवाद साधताना, काही आमदारांचा आपल्याशी संपर्क झाल्याचं सांगितलं होतं. शिवाय ,आमदारांना तिथे जबरदस्तीने डांबून ठेवले आहे किती दिवस ते गुवाहाटीला राहणार आहेत ते बघू असं देखील राऊत म्हणाले होते.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…