मोदींचा मास्टरस्ट्रोक ; महाराष्ट्राबाबत घेणार मोठा निर्णय…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- शिवसेनेचे नेते आणि महाविकास आघाडी सरकार मधील मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत काही आमदारांना घेत एक वेगळा गट स्थापन केला आहे.
यामुळे महाराष्ट्रात राजकीय भूकंप आला आणि महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं. यामुळे महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना मोठा वेग आला असतानाच आता एक मोठी बातमी समोर आली आहे.
भारतात पुढील काही वर्षांत राज्यांची संख्या वाढून ५० होणार असल्याचा दावा केला जात आहे. कर्नाटकचे मंत्री उमेश कट्टी यांनी हा दावा केला आहे. त्यांनी म्हटलं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत गांभीर्याने विचार सुरू केला आहे. २०२४ च्या निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी या संदर्भात महत्त्वाचं पाऊल उचलण्याची शक्यता आहे.
२०२४ नंतर भारतात ५० राज्ये
उमेश कट्टी हे कर्नाटकातील भाजप सरकारमध्ये मंत्री आहेत. त्यांनी म्हटलं, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर भारतातील राज्यांच्या संख्येत वाढ होऊन ५० इतकी करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला माहिती आहे की, यावर विचार सुरू आहे. राज्यांचं विभाजन करणं चांगली गोष्ट आहे कारण, गेल्या काही वर्षांतील लोकसंख्या पाहिली तर मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
महाराष्ट्राचं त्रिभाजन तर कर्नाटकाचं विभाजन
उमेश कट्टी यांनी पुढे म्हटलं, ५० राज्यांच्या निर्मितीचा कथितपणे विचार सुरू आहे. यानुसार, कर्नाटक राज्याचं विभाजन होऊन दोन राज्य, उत्तरप्रदेशची ४ राज्ये, महाराष्ट्राचं त्रिभाजन करुन तीन राज्यांची निर्मिती आणि तशाच प्रकारे इतर राज्य बनले पाहिजेत. उमेश कट्टी यांनी म्हटलं, लहान राज्यांची संख्या वाढली तर देशात रोजगार आणि विकासासाठी मार्ग खुले होतील. देशात यामुळे वातावरण चांगले होईल.
मुख्यमंत्री बोम्मई यांनी वृत्ताचं खंडन केलं
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी उमेश कट्टी यांनी केलेल्या दाव्याचं आणि राज्यांच्या विभाजानाच्या वृत्ताचं खंडन केलं आहे. बोम्मई यांनी म्हटलं, उत्तर कर्नाटकला वेगळ्या राज्याचा दर्जा देण्याच्या संदर्भात राज्य सरकारवर कुठलाही प्रस्ताव आलेला नाहीये. देशात राज्यांची संख्या वाढून ५० राज्ये करण्याचा प्रस्ताव असल्याची मला कुठलीही माहिती नाहीये आणि केंद्र सराकरने सुद्धा या बाबत कुठलीही चर्चा केली नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…