एकनाथ शिंदेचं शक्ती प्रदर्शन ; सोबत असलेल्या आमदारांसोबत एकत्र फोटोसेशन…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
सूरत :- एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे काही मंत्री आणि आमदार यांनी बंडाचा झेंडा हाती घेतल्याने महाराष्ट्रातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, कालपासून सूरत येथे असलेले शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गुवाहाटी येथे रवाना झाले आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यासोबत नेमके किती आमदार गेले आहेत. याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. त्याला आता एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांनी फोटोंच्या माध्यमातून उत्तर दिले आहे.
सूरत येथून गुवाहाटी येथे रवाना होण्यापूर्वी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी काढलेला फोटो समोर आला आहे. यामध्ये एकनाथ शिंदेंसोबत अब्दुल सत्तार, संदिपान भुमरे, शंभुराज देसाई आणि बच्चू कडू हे मंत्री तर प्रताप सरनाईक, तानाजी सावंत, सुहास कांदे यांच्यासह शिवसेनेचे इतर आमदारही दिसत आहेत. एकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेचे ३३ आणि बच्चू कडू व त्यांचे समर्थक असलेले एक आमदार आणि इतर एक आमदार असे मिळून ३६ आमदार आहेत.

दरम्यान, गुवाहाटीकडे रवाना होताना एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, शिवसैनिकांनी कुठलंही बंड केलेलं नाही. शिवसेना आमदारांनी कुठल्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. शिवसेना आणि बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्वापासून शिवसेना आमदार कधीही फारकत घेणार नाहीत. आम्ही शिवसेना सोडलेली नाही आणि सोडणार नाही. तसेच कुठल्याही पक्षात प्रवेश केलेला नाही. हिंदुत्व आणि बाळासाहेबांची भूमिका घेऊन आम्ही पुढे जात आहोत. बाळासाहेब ठाकरेंची शिकवण आणि धर्मवीर आनंद दिघेंच्या हिंदुत्वाची शिकवण याच्यासोबत आम्ही कधीही फारकत घेणार नाही, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….