आमदार रवी राणा यांच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट ; विधान परिषदेच्या निवडणुकीच्या आधी चर्चांना उधाण….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्याच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडत असताना आत्ताच एक मोठी अपडेट आलीय. भाजपचे सहयोगी आमदार आमदार रवी राणा यांच्या विरोधात जामिनपात्र वॉरंट जारी करण्यात आलंय.
अमरावतीचे महापालिका आयुक्त यांच्यावरील शाईफेक प्रकरणात हे वॉरंट काढण्यात आलं आहे. एवढेट नाही तर आमदार राणा यांच्या घरी अमरावती पोलीस पोहोचले हो, मात्र आमदार रवी राणा घरी नसल्याने वॉरंट कुणीही स्वीकारलं नाही. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. तर दुसरीकडे सोमवारी विधान परिषदेसाठी मतदान होणार आहे. सर्वच राजकीय पक्ष हे एका एका मतासाठी धावपळ करत आहेत. अशातच हे वॉरंट आल्याने अनेक राजकीय चर्चांणा उधाण आलं आहे. गेल्या काही दिवसात राणा दाम्पत्य विरुद्ध राज्य सरकार हा संघर्ष तर महाराष्ट्राने पाहिलाच आहे.
पुढच्या तारखेला हजर राहवे लागणार
आमदार रवी राणा यांच्यावर आयुक्तांवरील शाईफेक प्रकरणात कलम 353, 307 या कलमांतर्गत राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. आणि अत्ता याच प्रकरणात जामीनपत्र वॉरंट कोर्टाने काढलं आहे. त्यामुळेच पुढच्या तारखेला रवी राणा यांना कोर्टात हजर व्हावे लागेल हे आता स्पष्ट झालं आहे. हे शाईफेकीचे प्रकरण गेल्या अनेक दिवसांपासून गाजत आहे. अमरावतीतील पुतळ्यावरून सुरू झालेला हा वाद आता कोर्टापर्यंत पोहोचला आहे. काही दिवसांपूर्वीच राणा यांना जामीन मंजूर करत कोर्टाने दिलासा दिला होता. त्यामुळे काही राणा यांना अटकेपासून संरक्षण मिळाले होते. आत्ता पुढच्या तारखेला काय निर्णय कोर्टाकडून येतो, त्यावरही बऱ्याच घडमोडी अलंबून असणार आहेत.
नेमका वाद कसा पेटला?
अमरावतीतल्या एका चौकात पुतळा बसवण्यात आला होता. हा पुतळा बेकायदेशील असल्याचे सांगत पालिकेने हा पुतळा रातोरात हटवला. त्यानंतर राणा दाम्पत्य हे चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी कार्यकर्त्यांसह जोरदार आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी त्यांची धरपकड केली होती. तेव्हापासून अमरावतीचे पालिका आयुक्त आष्टीकर आणि रवी राणा यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू होते. याचेच रुपांतर पुढे शाईफेक प्रकरणात झालं. त्यानंतर मात्र राणा यांच्या अडचणी वाढतच गेल्या. राणा यांच्यावर गुन्हे दाखल झाल्यानंतर राणा यांनी हे राजकीय षडयंत्र असल्याचा आणि आपल्याला या प्रकरणात गोवण्यात येत असल्याचाही आरोप वारंवार केला आहे. तेव्हापासूनच राणा विरुद्ध शिवसेना हाही संघर्ष वाढला आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…