पोहरादेवी तीर्थक्षेत्राच्या विकास कामाला गती द्या ; मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- पोहरादेवी संस्थानच्या महंतानी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पोहरादेवी तीर्थक्षेत्राच्या विकास कामाला गती देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.
देशातील बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी या तीर्थक्षेत्राच्या विकास कामास गती देण्याच निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले. या तिर्थक्षेत्राचा कालबद्ध आढावा घेण्याच्या सूचनाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केल्या.
पोहरादेवी येथील महंतांनी मुख्यमंत्र्यांची आज वर्षा निवासस्थानी भेट घेतली. त्यामध्ये महंत बाबूसिंग राठोड, मेहताब सिंग नाईक, अॅड अभय राठोड, पोपट चव्हाण व बंजारा समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.
पोहरादेवी तीर्थक्षेत्राचे काम रखडता कामा नये – मुख्यमंत्री म्हणाले की पोहरादेवी तीर्थक्षेत्राचे काम रखडता कामा नये. वेळच्या वेळी यासाठी निधी दिला जात असला, तरी कालबद्ध रितीने कामे पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सिताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आदी उपस्थित होते…

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…