शुक्रवारी नाही तर सोमवारी होणार चौकशी ; राहुल गांधी ची मागणी ईडी कडून मान्य…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- नॅशनल हेराल्ड प्रकरणी सलग तीन दिवस जवळपास तीस तास राहुल गांधी यांची चौकशी करण्यात आली होती.
त्यानंतर त्यांना पुन्हा एकदा शुक्रवारी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं. पुढील चौकशीसाठी सोमवारपर्यंतची वेळ देण्यात यावी असं राहुल गांधींनी म्हटलं होतं. त्यांची ही मागणी ईडीनं मान्य केली असून आता पुढील चौकशी सोमवारी केली जाणार आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
राहुल गांधी यांची मागणी मान्य करत ईडीनं त्यांना नवं समन बजावलं आहे, तसंच सोमवारी चौकशीसाठी बोलावलं आहे. सक्तवसूली संचालनालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना २० जून रोजी नॅशनल हेराल्ड प्रकरणाच्या तपासाच्या चौकशीसाठी येण्यासाठी नवीन समन्स जारी केलं आणि त्यांची आई आणि काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आजारपणाचा विचार करून संस्थेनं त्यांची विनंती मान्य केल्याचं ईडीच्या सूत्रांनी सांगितलं.

बुधवारी त्यांना त्यांच्या यंग इंडियामधील हिस्स्याशी निगजीत डॉक्युमेंट्सच्या आधारावर प्रश्न विचारण्यात आले. ईडीद्वारे त्यांना जवळपास ३५ प्रश्न विचारण्यात आले. बुधवारी देखील ईडीनं त्यांनी जवळपास १० तास चौकशी केली. दरम्यान, राहुल गांधी यांच्या चौकशीच्या विरोधात काँग्रेसचे कार्यकर्तेही आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. यापूर्वीही पोलिसांनी काँग्रेसच्या काही नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…