स्व. मोहनलालजी पुरोहित महाविद्यालयाची उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम ; सलग तिसऱ्या वर्षीही १०० टक्के निकाल ;
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :
येथील स्व. मोहनलालजी पुरोहित कनिष्ठ महाविद्यालयातील कला व विज्ञान शाखेच्या उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम राखली आहे.विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के तर कला शाखेचा निकाल ९८ पूर्णांक १४ टक्के लागला आहे.विज्ञान शाखेतून श्रीकांत बाबुसिंग राठोड या विद्यार्थ्याने ८८.१७ टक्के घेत महाविद्यालयातून प्रथम क्रमांक पटकाविला.तर कु.ऋतुजा दिगांबर सावंत या विद्यार्थिनीला ८४.८७ टक्के प्राप्त करीत दुसरा क्रमांक येण्याचा बहुमान मिळवला.त्यापाठोपाठ कु.कांचन धनंजय पाटील ८४.६७ टक्के ,संकेत शंकर जायम्हत्रे ८४.३३टक्के ,कु.अंकिता देशमुख ८३.१७ टक्के गुण प्राप्त केले आहे.

कला शाखेतून सावन भिकचंद जाधव या विद्यार्थ्याने ७०.३३ टक्के घेत प्रथम क्रमांक मिळविला.गजानन विनोद पवार ६९.१७ टक्के याने दुसरा क्रमांक पटकाविला.कु. राजनंदिनी बाळू चव्हाण ६७.५० टक्के, कु.ज्योती चरणदास चिरमाडे ६७.५० टक्के, पूनेश केशव राठोड ६७ टक्के गुण प्राप्त केले आहे.
शिवाय कला व विज्ञान शाखेतून अनेक विद्यार्थ्यां प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम ठेवल्याने या यशाबद्दल महाविद्यालयाचे संस्थापक रितेश मोहनलाल पुरोहित, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भरोस चव्हाण ,तसेच प्राचार्य दीपक संगेवार,प्राध्यापिका कु.अंबिका मुनेश्वर,प्राध्यापक मारोती गोरे,प्राध्यापक सचिन शिंदे, प्राध्यापिका रिजवाना खान,प्राध्यापक ओमकार भुसारे,लिपिक रामराव राठोड,यांनी कौतुक केले आहे.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…