मोटार वाहन शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी विहीत परिक्षा देणे अनिवार्य :- उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे ; फसव्या जाहिरातींना बळी पडू नये ; ई-सेवा केंद्र, इंटरनेट कॅफे व मोटार ड्रायव्हिग स्कुलची होणार तपासणी…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 10 मे :- केंद्रीय मोटार वाहन नियमान्वये शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी अर्ज करतांना उमेदवारास केंद्र शासनाने विहीत केलेली परिक्षा देणे अनिवार्य आहे. या मागचा प्रमुख उदेश हा संबंधित अर्जदारास वाहतूक नियमांचे, चिन्हाचे व वाहन चालकाच्या जबाबदाऱ्यांचे महत्व याची महिती व जाणिव असणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे वाहन चालकांमध्ये जबाबदारीची जणिव निर्माण होते. यासाठी संगणकीय प्रणालीचा वापर करतेवेळी पालकांनी त्यांच्या पाल्यास या परिक्षेचे महत्व पटवून देणे आवश्यक ठरते तसेच उक्त प्रणालीचा गैरवापर होणार नाही याची जाणीवदेखील करून देणे आवश्यक आहे.
मात्र शिकाऊ अनुज्ञप्ती व वाहन चालक अनुज्ञप्तीच्या चाचणीकरीता तात्कळ सेवा उपलब्ध केलेल्या धोरणाचा गैरफयदा सायबर कॅफे घेत असून आर. टी. ओ. मध्ये जाण्याची व टेस्टची गरज नसून फक्त फोटो व आधार कार्ड द्या आणि शिकाऊ अनुज्ञप्ती मिळवा तशी जाहीरात प्रसिध्द करून गैरव्यवहार सुरू असल्याचे परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे.
यासंदर्भाने महा ई-सेवा केंद्र, इंटरनेट कॅफे व मोटार ड्रायव्हिग स्कुल इत्यादी संस्थामध्ये परिवहन विभागामार्फत अचानक भेटी देऊन या ऑनलाईन सुविधांचा गैरवापर होत असल्याचे आढळल्यास अशा दोषी संस्थेवर संबंधित काद्यातील तरतुदीप्रमाणे व अर्जदारवर मेाटार वाहन अधिनियमाच्या कलमान्वये कारवाई करण्यात येवून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांनी कळविले आहे.

“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…
परप्रांतीयांचे धाबे दणाणले..! रिक्षा चालकांना मराठी येतं का..? तपासणी सुरु; 15 ऑगस्टनंतर थेट….
जम्मू-काश्मीरमध्ये रोपवे हवेत अचानक बंद, ३०० पर्यटक अडकले; रेस्क्यू ऑपरेशन जारी….
पेट्रोल-डिझेल दरवाढ, तुटवड्याने शेतकरी अडचणीत; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जागतिक संकट अन् मागणीही वाढलीय…