नवाब मलिकांना न्यायालयाचा दणका ; ईडीच्या कोठडीत २० मे पर्यंत वाढ….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या न्यायलयीन कोठडीत पुन्हा वाढ करण्यात आली आहे. आज झालेल्या सुनावणीनंतर न्यायलयाने त्यांना २० मे पर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
या आगोदर नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली होती. मलिक यांना अटक केल्यानंतर ईडीने त्यांना विशेष न्यायालयात हजर केलं होतं. ईडीकडून नवाब मलिक यांच्या १४ दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने आठ दिवसांचीच कोठडी मंजूर केली होती. आता त्यांच्या कोठडीत पुन्हा वाढ करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण ?
दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी ईडीने त्यांच्याविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. ईडीने नवाब मलिकांच्या विरोधात ५ हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…