मोठी बातमी ; जेलमधून सुटताच राणा दांपत्य घेणार या नेत्यांची भेटणार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मुख्यमंत्र्यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचं आव्हान दिल्यानंतर खासदार नवनीत राणा (Navneet Rana) व आमदार रवी राणा (Ravi Rana) चांगलेच अडचणीत सापडले.
राणा दांपत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
मुंबई सत्र न्यायालयाने राणा दांपत्याला दिलासा देत बुधवारी सशर्त जामीन मंजूर केला. राणा दांपत्याला न्यायालयाने पाच अटी घातल्या असून त्यांची आज कारागृहातून सुटका होण्याची शक्यता आहे. जेलमधून बाहेर येताच राणा दांपत्य भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांची भेट घेणार आहेत.

किरीट सोमय्या यांनी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली आहे. आज तुरूंगातून परत येताच मी नवनीत राणा आणि रवी राणा यांना त्यांच्या मुंबईतील खार येथील निवासस्थानी भेटणार, अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे.
दरम्यान, राणा दांपत्याला विशेष न्यायालयाने पाच अटींसह 50 हजार रूपयांची वैयक्तिक हमी व तितक्याच रकमेचे हमीदार देण्याचे आदेशही दिले आहेत. त्यामुळे या अटींचे पालन केले तरंच राणा दांपत्याची सुटका होणार आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…