राणा विरुद्ध शिवसेने वाद पेटला ; अमरावतीत शिवसेना भवनाची आत मध्ये घुसून केली तोडफोड….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अमरावती :- हनुमान चालीसा वादावरून काही दिवसांपूर्वी राणा दाम्पत्य विरुद्ध शिवसेना असा वाद रंगला होता.
मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करू असं आव्हान आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी शिवसेनेला दिले होते. मात्र राणा दाम्पत्याच्या आव्हानानंतर शिवसैनिकांनी संतप्त भूमिका घेत राणा दाम्पत्याच्या घराबाहेर आंदोलन केले. अमरावती तसेच मुंबईतील खार निवासस्थानाबाहेर मोठ्या संख्येने शिवसैनिक जमले आणि त्यांनी घोषणाबाजी केली.
हनुमान चालीसा पठण करणार असा ठासून सांगणाऱ्या राणा दाम्पत्याविरोधात शिवसैनिक २ दिवस रस्त्यांवर उतरले होते. काहींनी मातोश्रीबाहेर ठाण मांडलं होते. राणा दाम्पत्याविरोधात पोलिसांनी कारवाई करत राजद्रोहाचा खटला भरला. त्यानंतर अखेर १४ दिवसांनी राणा दाम्पत्याला कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर अमरावतीत मोठा जल्लोष करण्यात आला. युवा स्वाभिमान कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात राणा दाम्पत्याला जामीन मिळाल्याचा आनंद व्यक्त केला. मात्र याचवेळी राणा समर्थकांनी शिवसेनेला निशाणा बनवला.
अमरावतील राजापेठ येथे असणाऱ्या शिवसेना भवनात आत घुसून राणा समर्थकांनी खुर्च्यांची तोडफोड केली. युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून अमरावती येथील शिवसेना भवनासमोर फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद साजरा केला. त्यानंतर आमदार राणांच्या कार्यकर्त्यांकडून शिवसेना भवनाची तोडफोड केली. यावेळी घटनास्थळी पेट्रोल बॉटल आढळली. या घटनेनंतर तात्काळ पोलिसांनी ४ हल्लेखोरांना ताब्यात घेतलं असून शहरात तणाव वाढण्याची चिन्हे आहेत.
राणा दाम्पत्याला सशर्त जामीन मंजूर
मुंबई सत्र न्यायालयाने बुधवारी राणा दाम्पत्याला जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे त्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. जवळपास १३ दिवस कोठडीत राहिल्यानंतर राणा दाम्पत्याला सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. यामुळे अमरावतीत कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. अमरावतीतील राणा यांच्या घरी कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून ढोल ताशावर ताल धरला होता.
काय आहे प्रकरण?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निवासस्थान मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करण्याचे आव्हान देणाऱ्या राणा दाम्पत्याविरोधात शिवसैनिक आक्रमक झाल्यानंतर या दाम्पत्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यातच राणा दाम्पत्याविरोधात राजद्रोहाच्या गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे त्यांच्यासमोरील अडचणी वाढल्या होत्या.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….