महागावात ४ मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून नोटीस ; राज ठाकरेंच्या अटकेच्या शक्यतेवर, पोलिसांसकडून खबरदारी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :-
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या हनुमान चालीसा पठणाच्या ईशाऱ्यावरून व त्यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे त्यांची अटक होवु शकते यामुळे राज्यात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून खबरदारी घेतल्या गेली आहे. याचपार्श्वभूमीवर आज महागाव तालुक्यातील मनसे पक्षाच्या मुख्य ४ पदाधिकाऱ्यांना पोलीसांनी भांदवी कलम ब१४९ अंतर्गत नोटिसा बजावण्यात आल्या आहे.
भोंग्याच्या मुद्द्यावरून आज राज्यातील राजकारण चांगलेच तापल्याने, ह्या मुद्द्याला वाचा फोडणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे सैनिकांना हनुमान चालीसा पठणाचा आदेश दिल्या नंतर आज ठिकठिकाणी मनसे कडून हे आंदोलन चालविण्यात आले. यामुळे सामाजिक तेढ आणि अराजकता माजू नये म्हणून पोलीस प्रशासना कडून अनेक पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली. तर महागाव तालुक्यातील मनसे तालुका अध्यक्ष सुनिल चव्हाण, शहराध्यक्ष संतोष जाधव, मनविसे तालुकाध्यक्ष महेश कामारकर,मनसे तालुका उपाध्यक्ष राहुल जयस्वाल या पदाधिकाऱ्यांना महागाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार विलास चव्हाण यांच्या स्वाक्षरीच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…