नांदेड शहरात भर रस्त्यावर एका संपादकाची हत्या…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नांदेड :- नांदेड शहरातील ‘स्वतंत्र मराठवाडा’ या वर्तमानपत्राच्या संपादकाची भर रस्त्यावरच हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. प्रेमानंद जोंधळे असे संपादकाचे नाव आहे.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सोमेश कॉलनी भागात राहणारे प्रेमानंद जोंधळे हे आपल्या घरातून बाहेर निघाले होते. ते मिल रोडवर चालत असताना त्यांच्या घराजवळ राहणारा कृष्णा हातांगळे हा त्यांच्या समोर आला आणि त्याने जोंधळे यांच्या पोटावर आणि छातीवर चाकूने जवळपास ७ ते ८ वार केले. चाकूने वार करून आरोपी पळून गेला आहे.
शनिवारी रात्री ९ च्या सुमारास भर रस्त्यावर हा प्रकार घडल्याने नांदेड शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…