अवघ्या सात वर्षाच्या “आहील” ने केले 30 रोजे पूर्ण…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अनिल बोम्पीलवार
हिवरा संगम :- मुस्लिम समाजात रमजान महिना हा अतिशय पवित्र समजल्या जातो या महिन्याला एक अनन्यसाधारण महत्त्व सुध्दा आहे. या रमजान महिन्यात या समाजातील मुस्लिम धर्मीय अतिशय अवघड समजले जाणारेअसे रोजे अर्थातच उपवास करतात. या उपवासा दरम्यान त्यांना दिवसभर पाणी सुद्धा वर्ज्य असते. अशा तप्त उन्हाळ्यात अक्षरशा अंगाची लाहीलाही होत असताना 45 ते 47 डिग्री तापमान असतानादेखील हिवरा येथील अवघ्या सात वर्षाच्या आहिल वसीम सुरय्या या मुलाने हे अतिशय अवघड असलेले या महिन्यातील तीस रोजे पूर्ण केले आहे. हिवरा येथील प्रसिद्ध धान्य व्यापारी श्री शफी हबीब सुरय्या यांचा तो नातू आहे. अतिशय कमी वयात अगदी सहजपणे अतिशय अवघड समजले जाणारे हे 30 रोजे पूर्ण केल्याबद्दल व त्याच्या धार्मिक वृत्तीबद्दल आहिल, चे त्याच्या समाजात व गावात कौतुक होत आहे.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…