कोणी ही मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी आलं तर….; रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला 3 मे पर्यंतचं अल्टिमेटम दिलं आहे. राज ठाकरेंच्या या भूमिकेला रिपाईचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले सुरूवातीपासूनच विरोध करताना दिसत आहेत.
राज्यात मशिदींवरील भोंग्यांवरून राजकारण रंगताना दिसत आहेत. मशिदींवरील भोंग्यावरून सुरू असलेल्या वादाबद्दल बोलताना रामदास आठवले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मशिदींवरील भोंगे काढायला कोणी आलं तर आमचे कार्यकर्ते विरोध करतील असं वक्तव्य रामदास आठवलेंनी केलं आहे.
आमच्या पक्षाचे लोक मशिदींचं संरक्षण करतील. मशिदींवरील भोंगे काढायला कोणी आलंच तर आमच्या पक्षाचे कार्यकर्ते त्याला विरोध करतील. भोंगे काढायला आलेल्या लोकांनाही विरोध करतील. भोंगे काढण्याच्या भूमिकेचा आम्ही विरोध करतो, असंही रामदास आठवले म्हणाले आहेत.
दरम्यान, मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना आठवलेंनी मुस्लीम सामुदायाला शांत राहण्याचं आवाहन केलं आहे. तसेच मुस्लीम समाजातील चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या मौलानांनी शांत राहिलं पाहिजे, असंही आठवले म्हणाले. तर आठवलेंच्या वक्तव्यावर आता मनसे (MNS) काय प्रतिक्रिया देणार हे बघावं लागेल.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…