अनिल देशमुखांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा वाढ ; १३ मे कोठडी ; दिलासा नाहीच….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची न्यायालयीन कोठडीत वाढ
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची न्यायालयीन कोठडीत वाढ झाली आहे. १३ मे पर्यंत ही कोठडी वाढली असल्याने त्यांचा न्यायालयीन कोठडीतला मुक्काम वाढला आहे.
अनिल देशमुख यांना मुंबईतील विशेष न्यायालयाने आणखी १४ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आणखी काही दिवस त्यांना कोठडीतच काढावे लागणार आहेत.
राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. त्यावेळी मागली सुनावणीदरम्यान, देशमुख यांच्या सीबीआय कोठडीत वाढ करण्यात यावी, अशी विनंती सीबीआयच्यावतीने करण्यात आली होती. मात्र, विशेष सीबीआय कोर्टाने ही विनंती फेटाळली आणि देशमुख यांना २९ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली होती. आता पुन्हा एकदा आज न्यायालायने ही कोठडी १४ दिवसांपर्यंत वाढवून १३ मे पर्यंत केली आहे.
दरम्यान, देशमुख सध्या सीबीआय कोठडीत आहेत. आज त्यांना आणखी १४ दिवसांची कोठडी वाढवून देण्यात आली आहे. ज्या पोलिसांच्या बदल्यांबाबत तपास करायचा आहे त्यांची चौकशी करायची असल्याने देशमुख यांना मध्यंतरी तीन दिवस अधिक कोठडी द्यावी, अशी मागणी सीबीआयच्या वतीने करण्यात आली होती. सीबीआयने रिमांडसाठी दिलेली कारणे असमाधानकारक आहेत, असे मत न्यायालयाने व्यक्त करत त्यांना चौदा दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. आज त्यावर पुन्हा न्यायालयाने निर्णय दिला आहे.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…