बेरोजगारांसाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- देशात वाढत असलेल्या बेरोजगारीवरून राजकारण तापलेलं असताना आता ठाकरे सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील 18 ते 45 वयोगटातील बेरोजगारांसाठी ठाकरे सरकारनं मोठा निर्णय घेत असल्याचं घोषित केलं आहे.
राज्यात शैक्षणित पात्रतेप्रमाणं सेवायोजन कार्यालयाकडं तब्बल 45 लाख बेरोजगार युवक-युवतींची नोंद आहे. तर नोंद नसलेल्यांची संख्या देखील मोठी आहे. शैक्षणिक पात्रता असून देखील नोकरी मिळत नसलेल्यांसाठी सरकारनं बेरोजगार भत्ता देण्याची घोषणा केली आहे.
नोकरी लागेपर्यंत 5 हजार रूपये भत्ता मिळणार आहे. रोजगार हवी असलेली व्यक्ती पात्र आहे. बेरोजगार भत्ता मिळण्यासाठी काही अटी आणि शर्थी ठेवण्यात आल्या आहेत. राज्य सरकार बेरोजगार भत्ता मिळण्यासाठी एक स्वतंत्र व्यवस्था तयार करणार आहे.
दरम्यान, शासनाकडून लवकरच बेरोजगार भत्त्याबाबत नियमावली जाहीर होणार आहे. या नियमावलीनूसार बेरोजगार भत्ता योजनेत गैरव्यवहार करणाऱ्यांना शिक्षा असणार आहे.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…