सहा वेळ पक्ष बदलला ; शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी मानेचा भाजपात दुसऱ्यांदा प्रवेश….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
हिंगोली :- माजी खा. शिवाजी माने यांनी सहाव्यांदा पक्ष बदलला असून, भाजपमध्ये दुसऱ्यांदा प्रवेश केला आहे.
मुंबईत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत त्यांनी हा प्रवेश केला. शिवसेनेकडून दोनदा खासदार राहिलेल्या शिवाजी माने यांनी सोमवारी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला.
सेनेकडून खासदारकीला पडले असताना २००४ नंतर त्यांनी काँग्रेस प्रवेश केला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपमार्गे मागच्या विधानसभेच्या वेळी शिवबंधन बांधले होते. मात्र, दिलेली आश्वासने सेनेने पूर्ण न केल्याने त्यांनी पुन्हा भाजप प्रवेशाचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला होता; परंतु त्यांच्या पक्षप्रवेशाला मुहूर्त सापडत नव्हता. अखेर २५ एप्रिल रोजी हा मुहूर्त सापडला.
मुंबईत केंद्रीय मंत्री नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, आ. तानाजी मुटकुळे, जिल्हाध्यक्ष रामराव वडकुते, मिलिंद यंबल आदींच्या उपस्थितीत सोमवारी माने यांनी भाजपप्रवेश केला. सेनेने हिंदुत्वाच्या मुद्यासह आपल्या मूळ विचारधारेपासून फारकत घेतली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वत:सह मुलाचे हित पाहत असून, कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडल्याची टीका माने यांनी पक्ष सोडताना केली.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…