लिलाव घाट मराठवाड्यातील उत्खनन मात्र विदर्भाच्या हद्दीतून ; महसूल विभाग हप्तेखोरीत मशगुल ; दहिसावळी नदीपात्रातुन उत्खनन ; जिल्हाधिकारी अनभिज्ञ
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रियाज पारेख :९६३७८८६७७७
महागाव :
मराठवाड्यातील लांजी रेती घाट लिलाव करण्यात आला आहे.परंतु या रेती माफियाने चक्क महागाव महसूल च्या नाकावर टिच्चून दहिसावळी व भोसा पैनगंगा नदी पात्रातून बेसुमार अवैध रेती उत्खनन सुरू केले आहे. महसूल विभागाच्या डोळ्यात धूळफेक करून अहोरात्र ट्रेझर बोट आणि टू टेन जेसीबीच्या सहाय्याने रेती घाटाची अवैधपणे सफाई सुरू केली आहे.या प्रकाराची माहिती सर्वश्रुत असताना महसूल विभाग मात्र हप्तेखोरीत मशगुल झाला आहे.उपविभागीय महसूल प्रशासनाने रेती तस्करांसमोर नांगी टाकल्याचे चित्र दिसत आहे.
त्यामुळे जिल्हाधिकारी या प्रकाराबाबत अनभिज्ञ असल्याचा कयास लावण्यात येत आहे.यवतमाळ जिल्हाधिकारी यांनी याकडे लक्ष केंद्रित करून दस्तुरखुद्द कार्यवाही करण्याची मागणी पर्यावरण प्रेमींनी रेटून धरली आहे.
माहुर,उमरखेडचा महसुल उपविभाग आणि महागाव तहसिलची कुंभकर्णी यंत्रणा बाजार घेवून साखर झोपेत असल्याने या वाळू तस्करीला महसुल प्रशासनाचा छुपा आशीर्वाद असल्याची चर्चा होत आहे. पैनगंगेच्या काठावर पलीकडे मराठवाडा तर आलीकडे विदर्भाची सीमा सुरू होते. मराठवाडयातील लांजी,माहुर भागातील रेती तस्करांनी सध्या महागाव तालुक्याच्या हद्दीत बेसुमार अवैध रेती तस्करी सुरू केली आहे.

लांजी येथील वाळू माफियाने प्रशासनाला मुठीत घेतले असून तोच या संपुर्ण अवैध वाळू तस्करीचा मास्टरमाइंड आहे. विदर्भाच्या हद्दीतील भोसा,दहीसावळी गावानजीक पैनगंगेच्या पात्रात रेतीचा प्रचंड साठा आहे.दहिसावळी घाट लिलावात गेला नाही. त्यामुळे मराठवाड्यातील रेती माफियांनी भोसा आणि दहिसावळी हद्दीत घुसखोरी करीत मोठ्या प्रमाणात अवैध वाळू तस्करी सुरू केली आहे. ट्रेझर बोट येथे अहोरात्र वाळू उपसा करीत आहेत,जेसीबी, व अन्य वाहनाने ही बहुमुल्य रेती चोरीच्या मार्गाने महागाव,उमरखेड, पुसद तालुक्यात विकण्यात येते.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….