मोठी बातमी ; राणा दाम्पत्याच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल ; दोघांचा मुक्काम कारागृहात….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई, 24 एप्रिल :- खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना काल खार पोलिसांनी (Khar Police) अटक केली.
त्यानंतर आज राणा दाम्पत्याला वांद्रे येथील सुट्टीकालीन न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सरकारी वकीलांनी राणा दाम्पत्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली. तर राणा दाम्पत्यांचे वकील अॅड रिझवान मर्चंट यांनी विरोध केला. त्यानंतर कोर्टाने राणा दाम्पत्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
तसेच राणा दाम्पत्याच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं सरकारी वकिलांनी सांगितलं आहे. सुनावणी पार पडल्यावर विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी कोर्टाच्या बारे प्रसारमाध्यमांना सांगितले की, आज कोर्टात आरोपींना हजर करण्यात आले. आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपींनी त्यानंतर लगेचच तात्काळ जामीनासाठी अर्ज केला.
या जामीन अर्जावर कोर्टाने आम्हाला 27 एप्रिल रोजी लेखी म्हणं मांडण्यास सांगितलं आहे. आम्ही 27 तारखेला युक्तिवाद करणार आहोत.
मुख्यमंत्र्यांच्या बाबत अपशब्द वापर करुन त्यांना चॅलेंज केलं. तसेच शासनाला चॅलेंज केलं आहे.
त्यांना 149 अंतर्गत नोटीस देण्यात आली होती की, तुम्ही शांतता ठेवणं तुमचं कर्तव्य आहे त्यामुळे तुम्ही परत जा. पण त्यांनी त्या नोटीसला न जुमानता शासनाला आव्हान दिलं. आरोपींविरोधात 124 अ अंतर्गत देशद्रोहाचा सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 29 एप्रिलपर्यंत आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे आणि 29 एप्रिल रोजी त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होईल असंही सरकारी वकील प्रदीप घरत यांनी म्हटलं आहे.
सुट्टीकालीन कोर्टाने जामीनावर तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिल्याने आता नवनीत राणा यांची रवानगी भायखळा कारागृहात तर रवी राणा यांची रवानगी आर्थररोड कारागृहात करण्यात येणार आहे. कोर्टात काय घडलं? वांद्रे कोर्टात सरकारी वकिलांनी राणा दाम्पत्याच्या 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. यानंतर राणांविरोधात लावलेल्या कलमांवर राणा दाम्पत्यांचे वकील अॅड रिझवान मर्चंट यांनी आक्षेप घेतला. सरकारी वकिलांनी मागणी केलेल्या राणा दाम्पत्याच्या पोलीस कोठडीला अॅड रिझवान मर्चंट यांनी विरोध केला.
ही अटक बेकायदेशीर आहे. दोघेही लोकप्रतिनिधी आहेत. पोलिसांनी कलम 149 नुसार प्रतिबंधात्मक नोटीस बजावली होती त्यानुसार घराबाहेर पडले नाहीत. तेथे शिवसैनिक जमले त्यांनी कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण केला पण त्यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही. राजकीय हेतूने ही कारवाई करण्यात आलीये असंही अॅड रिझवान मर्चंट यांनी म्हटलं.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….