मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार ; भाजप विरुद्ध शिवसेना वाद सुरू ; गृहमंत्री म्हणाले , पोलीस कारवाई करतील….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मुंबई शहरात पुन्हा एकदा भाजप विरुद्ध शिवसेना वाद सुरू झाला आहे.
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर खार पोलीस स्टेशनबाहेर हल्ला करण्यात आला. शिवसैनिकांच्या हल्ल्यात सोमय्यांच्या गाडीची काच फुटली आणि त्यांच्या तोंडालाही दुखापत झाली. या हल्ल्यावर आता महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “कालची घटना दुर्दैवी, मात्र सर्वांनी समजूतदारपणा दाखवावा. त्या संदर्भात पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे,- पोलीस योग्य ती कारवाई करतील,” असे पाटील म्हणाले.
‘पोलीस कारवाई करतील…’
या प्रकरणावर माध्यमांशी बोलताना दिलीप वळसे पाटील म्हणाले की, “गेले दोन दिवस मुंबईत हनुमान चालीसाच्या नावाने गोंधळ घालण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी योग्य ती कारवाई म्हणून राणा दाम्पत्याला अटक केली. पण, रात्री किरीट सोमय्यांवर हल्ल्याची जी घटना घडली आहे, त्याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार पोलीस आपली कारवाई करतील. राष्ट्रपती राजवटीची मागणी कोणी केली अस काही दिसत नाही. अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे”, असं वळसे पाटील म्हणाले.
“समजूतदारपणा दाखवावा”
ते पुढे म्हणाले की, “घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. पण आता त्यात सगळ्यांनीच समजुतीने सहकार्य करायला हवं. दगडफेक झाली आहे हे खरं आहे. ती कुणाकडून झाली काय झाली, हा तपासाचा भाग आहे. राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार केलीये, त्याच्यावर पोलीस चौकशी करून कारवाई करतील. पोलिसांना वेगळे आदेश देण्याची गरज नाही, त्यांना त्यांचे काम काय आहे हे माहिती आहे. त्याप्रमाणे त्यांनी त्यांचे कर्तव्य पार पाडलं पाहिजे”, असंही ते म्हणाले.
काल रात्री नेमकं काय झालं…?
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी दिलेल्या हनुमान चालीसा पठणाच्या इशाऱ्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. राणा दाम्पत्याला अटक केल्यानंतर किरीट सोमय्या खार पोलीस स्टेशनमध्ये त्यांना भेटण्यासाठी गेले, पण परत जाताना त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. यात किरीट सोमय्या किरकोळ जखमी देखील झाले. त्या हल्ल्यानंतर आता भाजपनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यभरात भाजप कार्यकर्त्यांनी सुचेल तशाप्रकारे आंदोलन करावे. आता ही लढाई भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी सरकार आहे. या लढाईसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहनच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….