शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या डायरीत मातोश्री शिवाय आणखी “ही” दोन नावे ; चर्चांना उधाण….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिवसेनेचे नेते आणि माजी बीएमसी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या डायरीची चर्चा राज्यात जोरदार सुरु आहे.
आयकर विभागाच्या धाडीमध्ये मिळालेल्या यशवंत जाधव यांच्या डायरीमध्ये ‘मातोश्री’ शिवाय अन्य दोघांची नावे आहेत. त्यातील एकाचा उल्लेख केबलमॅन असून दुसरी व्यक्ती महिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यशवंत जाधव यांच्यासोबत आता इतरांच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
यशवंत जाधव यांच्या डायरीत 2 कोटी रुपये आणि 50 लाखांच मातोश्रीला दिल्याचा उल्लेख होता मात्र आणखी दोन नावांचाही उल्लेख असल्याची माहिती आता समोर आल्याने खळबळ उडाली आहे. जाधव यांच्या डायरीत शिवसेनेच्या आणखी दोन नेत्यांची नावं आहेत. त्यातील एकजण मंत्रीपदावर आहेत तर दुसऱ्या महिला नेत्या आहेत. या महिला नेत्या मुंबई महापालिकेत चर्चेत असतात, अशी माहिती सूत्रांनी दिली.
आयकर विभाग करणार चौकशी
जाधव यांच्या डायरीत केबलमॅन अशा एका नावाचा उल्लेख आहे. या नावापुढे त्यांनी 75 लाख, 25 लाख आणखी 25 लाख असे एक कोटी 25 लाख दिल्याचा उल्लेख केला आहे. तर दुसरीकडे, आणखी एक नाव M-TAI असं लिहिलेलं असून त्यापुढे 50 लाख रुपये दिल्याचा उल्लेख आहे. या दोन लोकांविषयी आयकर विभागाकडून माहिती मिळवली जात आहे. लवकरच या दोघांनाही आयकर विभागाकडून समन्स बजावले जाण्याची शक्यता आहे.
जाधव यांच्या डायरीतले केबलमॅन आणि M-TAI असा उल्लेख असणारे हे व्यक्ती कोण याबद्दल अद्याप समजू शकले नाही. मात्र, या नावावरून वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत.
डायरीत मातोश्रीचे नाव
मागील महिन्यात यशवंत जाधव यांच्या घरावर त्यांच्या संपत्तीवर सोबत त्यांच्या निकटवर्तीयांच्या घरी आयकर विभागाने धाड टाकल्या. या आयकर विभागाच्या धाडीनंतर यशवंत जाधव यांच्या डायरीची सगळ्यात जास्त चर्चा सुरू आहे. या डायरीमध्ये यशवंत जाधव यांच्या हिशोबाच्या नोंदी आहेत. त्यात दोन कोटी रुपये आणि पन्नास लाख रुपयांच्या घड्याळीची नोंद मातोश्रीच्या नावे आहे. मात्र नोंद मातोश्री या आपल्या आई असल्याचा दावा यशवंत जाधव यांनी केला असल्याची आयकर विभागातील सूत्रांची माहिती आहे. आता या मातोश्रीच्या नोंदीवर राजकीय प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली.

काळजाचा ठोका चुकला..! एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, मुंबईत इमर्जन्सी लँडिंग…..
तामिळनाडूत राजकीय बॉम्ब, भाजपला रोखण्यासाठी DMKचा मोठा जुगार; विजय यांना CM करणार,सरकारला बाहेरून पाठिंबा….
ममता बॅनर्जींचे संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त, मुख्यमंत्रीपदही गेलं; बंगालमध्ये अभूतपूर्व राजकीय भूकंप, राज्यपालांनी TMCची सत्ता उलथवली….
कलिंगडला अखेर क्लिन चिट, मुंबईतील चौघांचा मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधामुळे, फॉरेन्सिक रिपोर्ट समोर….
तामिळनाडूतील सत्ता पेच वाढला, राज्यपालांविरोधात विजय घेणार सुप्रीम कोर्टात धाव..?
महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार, बोर्डाकडून मोठी घोषणा….