“वसंत नापसंत” ; वसंत यांची पुणे शहराध्यक्ष पदावरुन हकालपट्टी तर शहराध्यक्ष पदी बाबर यांची नियुक्ति…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- मशिदींवरील भोंगे काढण्याच्या राज ठाकरे यांच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या वसंत मोरे यांना शहराध्यक्ष पदावरून हटवण्याचा निर्णय खुद्द मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतला आहे.
दरम्यान, साईनाथ बाबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवीन शहराध्यक्ष असतील, अशी घोषणादेखील राज ठाकरे यांनी केली केली आहे. राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांवर केलेल्या विधानावर पुण्यात मनसेमध्ये दुफळीचे चित्र निर्माण झाले होते. त्यानंतर वसंत मोरे यांनी पक्षावर नाराजी व्यक्त केली होती.

मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालिसा प्रकरण मनसेमधील अंतर्गत वादालाच जास्त कारणीभूत ठरल्याचं दिसून येतंय. पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये यासंदर्भात नाराजीनाट्य रंगताना दिसून येत आहे. पुण्यातील मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी सर्वप्रथम माध्यमांसमोर येत यासंदर्भातील आपली भूमिका मांडली होती. राज ठाकरे यांनी या नाराज कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना आज मुंबईला बोलावून घेतले होते. मात्र, यामध्ये वसंत मोरेंचाच सहभाग नव्हता. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात होते. त्यानंतर आता राज ठाकरे यांनीच वसंत मोरे यांची मनसे शहराध्यक्ष पदावरून वसंत मोरे यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे.
नेमकं काय प्रकरण?
राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या निमित्ताने शिवाजी पार्कवर केलेल्या भाषणाची जोरदार चर्चा झाली. राज ठाकरेंनी ‘यू टर्न’ घेतला असा टीकेचा सूर होताच, शिवाय त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलेला कृती कार्यक्रमही वादग्रस्त ठरला. मशीदीच्या समोर भोंगे लावल्यास हनुमान चालिसा लावा, असे आदेश ठाकरेंनी दिले. यानंतर राज्यात धार्मिक द्वेष वाढीस लागत असल्याचं बोललं जातंय.
मुंबईच्या कुर्ल्यात मनसे कार्यकर्ते मशिदींसमोर हनुमान चालिसा पठन करणार असल्याचं म्हटलं. काही ठिकाणचे भोंगे देखील उतरवण्याची तयारी सुरू होती. अनेक ठिकाणी मनसैनिक आक्रमक झाले आहेत. मात्र, पुण्यात काही मनसैनिकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. पुण्याचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी माझ्या प्रभागात शांतता हवी असल्याने असं कोणतंही पाऊल उचलणार नसल्याचं म्हटलं होतं.

काळजाचा ठोका चुकला..! एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, मुंबईत इमर्जन्सी लँडिंग…..
तामिळनाडूत राजकीय बॉम्ब, भाजपला रोखण्यासाठी DMKचा मोठा जुगार; विजय यांना CM करणार,सरकारला बाहेरून पाठिंबा….
ममता बॅनर्जींचे संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त, मुख्यमंत्रीपदही गेलं; बंगालमध्ये अभूतपूर्व राजकीय भूकंप, राज्यपालांनी TMCची सत्ता उलथवली….
कलिंगडला अखेर क्लिन चिट, मुंबईतील चौघांचा मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधामुळे, फॉरेन्सिक रिपोर्ट समोर….
तामिळनाडूतील सत्ता पेच वाढला, राज्यपालांविरोधात विजय घेणार सुप्रीम कोर्टात धाव..?
महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार, बोर्डाकडून मोठी घोषणा….