उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित अभिनेत्री आसावरी जोशी आणि स्वागता शाह यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- आज (७ एप्रिल) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रसिद्ध अभिनेत्री आसावरी जोशी आणि अभिनेत्री स्वागता शाह यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यावेळी अजित पवार यांनी पक्ष प्रवेशासाठी प्रयत्न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले व मान्यवरांचे पक्षात स्वागत केले. मावळ तालुक्यातील अमोल केदारी, संस्थापक, बाळासाहेब आडकर (सरपंच ,शिवली), दिनकर आडकर (माजी पंचायत समिती सदस्य, मावळ), अरूण आडकर (शिवली, सामाजिक कार्यकर्ते) तसेच काँग्रेस पक्षाचे मावळ तालुका प्रवक्ते फिरोज शेख यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा हाती घेतला.

तसेच नवी मुंबईचे अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष सुलतान मालदार यांच्या पुढाकाराने नंदू भोपी, जिल्हाध्यक्ष, रायगड, सरपंच, भारत चौधरी, कामगार नेता, तळोजा, भानुदास म्हात्रे, उपसरपंच, नितळम तसेच इतर मान्यवरांनीही यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
दरम्यान, यावेळी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश प्रवक्ते महेश तपासे, प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, मावळ तालुकाध्यक्ष गणेश खांडगे उपस्थित होते.

काळजाचा ठोका चुकला..! एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, मुंबईत इमर्जन्सी लँडिंग…..
तामिळनाडूत राजकीय बॉम्ब, भाजपला रोखण्यासाठी DMKचा मोठा जुगार; विजय यांना CM करणार,सरकारला बाहेरून पाठिंबा….
ममता बॅनर्जींचे संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त, मुख्यमंत्रीपदही गेलं; बंगालमध्ये अभूतपूर्व राजकीय भूकंप, राज्यपालांनी TMCची सत्ता उलथवली….
कलिंगडला अखेर क्लिन चिट, मुंबईतील चौघांचा मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधामुळे, फॉरेन्सिक रिपोर्ट समोर….
तामिळनाडूतील सत्ता पेच वाढला, राज्यपालांविरोधात विजय घेणार सुप्रीम कोर्टात धाव..?
महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार, बोर्डाकडून मोठी घोषणा….