शिवसेनेचं मुंबईत उद्या शक्तिप्रदर्शन राऊतांचं होणार स्वागत…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- ईडी ने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची संपत्ती जप्त केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. या कारवाईनंतर संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप करत मोठा घोटाला उघड केल्याचा दावा केला आहे.
यानंतर आता संजय राऊत उद्या दिल्लीतून मुंबईत परत आल्यानंतर शिवसेनेकडून त्यांच्या जंगी स्वागताची तयारी केली जात आहे.
शिवसेना राऊत यांच्या स्वागता निमीत्ताने मुंबईत मोठे शक्तिप्रदर्शन करण्याची तयारीत आहे. या विषयीची अधिक माहिती अशी की, राऊत यांचे मुंबई विमानतळापासून ते भांडूप येथील त्यांच्या घरापर्यंत त्यांच स्वागत केलं जाईल, त्यासाठी चाळीस बसेस, ढोल ताशा पथकं अशी जंगी तयारी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. यावेळी शिवसेनेचे आमदार, खासदार यांच्यासह अनेक मंत्री देखील विमानतळावर उपस्थीत असण्याची शक्यता आहे.
दरम्यान संध्याकाळी चार वाजता संजय राऊत हे मुंबई विमानतळावर पोहचतील, त्यांच्या स्वागतासाठी मुंबई शहरातून अनेक शिवसैनिक येणार आहेत, यानिमीत्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. या स्वागत कार्यक्रमात मुंबईतील शिवसेनेचे सगळे आमदार, खासदार आणि मंत्री देखील सहभागी होणार आहेत.
आज राज्यसभेत बोलताना संजय राऊत यांनी सरकार तसेच केंद्रीय गृहमंत्र्यांवर कायद्याचा दुरुउपयोग होत असल्याचा आरोप केला. दरम्यान संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मुंबईत राऊतांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी देखील करण्यात आली आहे

काळजाचा ठोका चुकला..! एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, मुंबईत इमर्जन्सी लँडिंग…..
तामिळनाडूत राजकीय बॉम्ब, भाजपला रोखण्यासाठी DMKचा मोठा जुगार; विजय यांना CM करणार,सरकारला बाहेरून पाठिंबा….
ममता बॅनर्जींचे संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त, मुख्यमंत्रीपदही गेलं; बंगालमध्ये अभूतपूर्व राजकीय भूकंप, राज्यपालांनी TMCची सत्ता उलथवली….
कलिंगडला अखेर क्लिन चिट, मुंबईतील चौघांचा मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधामुळे, फॉरेन्सिक रिपोर्ट समोर….
तामिळनाडूतील सत्ता पेच वाढला, राज्यपालांविरोधात विजय घेणार सुप्रीम कोर्टात धाव..?
महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार, बोर्डाकडून मोठी घोषणा….