बस व ट्रक च्या धडकेत १ व्यक्तिचा मृत्यु , तर २४ जण गंभीर जखमी ; पुसदवरून ही बस अमरावतीला प्रवासी घेऊन निघाली होती…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अमरावती :- अमरावतीत :- हा अपघात नांदगाव खंडेश्वरजवळील शिंगणापूर चौफुलीवर झालेला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, अपघातानंतर बस चक्क रस्त्याच्या खाली घुसल्या जाऊन रस्त्याच्या कडेला गेली आहे.
त्यामुळे प्रवासी गंभीर जखमी झालेले आहे.
अमरावती – यवतमाळ मार्गावर बस व ट्रकची जबर धडक झालेली आहे. या भीषण अपघातात १ व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. तर, २४ व्यक्ती जखमी झाल्याची माहिती मिळते आहे. यातील ६ जखमी लोकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. हा अपघात नांदगाव खंडेश्वरजवळील शिंगणापूर चौफुलीवर झालेला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, अपघातानंतर बस चक्क रस्त्याच्या खाली घुसल्या जाऊन रस्त्याच्या कडेला गेली आहे. त्यामुळे प्रवासी गंभीर जखमी झालेले आहे. जखमींमध्ये दोन बालकांचा समावेश आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील पुसदवरून ही बस अमरावतीला प्रवासी घेऊन निघाली असतांना या बसचा अपघात झाला आहे. जखमी प्रवाशांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातात बस चांगलीच चपकल्या गेली आहे. त्यामुळे बसचे मोठे नुकसान झाले. तर येथील प्रवासीही गंभीर जखमी झाले आहे. तर, या अपघातात ट्रकचा समोरचा भाग चांगलाच चपकला असून ट्रकचे बरेच नुकसान झालेले आहे. एवढ्या मोठ्या अपघातानंतर घटनास्थळी एकच गर्दी जमली होती.

निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा ‘बुलडोजर’
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल ‘भाजपा’मधून लढणार ; रोहित पवारांचा मोठा दावा….
सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल भाजपमधूनच लढणार ; २२ आमदारही भाजपच्या वाटेवर, रोहित पवारांचा गौप्यस्फोट….
तामिळनाडूमध्ये मोठा धक्का, बहुमत चाचणीत विजय यांना १४४ आमदारांचा पाठिंबा ; एआयएडीएमके मध्ये फूट….
उदगाव बायपासवर पेट्रोलचा टँकर उलटला, १० हजार लिटर पेट्रोल सांडले….
इम्तियाज जलील हेच अर्बन टेररिस्ट! निदा खानला त्यांनीच लपवलं’; संजय शिरसाटांचा थेट हल्ला….