मनसे अध्यक्ष राज ठाकरे झाले आजोबा ; अमित आणि मिताली ठाकरेंना पुत्ररत्नाचा लाभ….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी आनंदाची बातमी आहे.
राज ठाकरे यांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे आणि सून मिताली ठाकरे यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे. ब्रीच कँन्डी रुग्णालयात मिताली यांनी गोंडस बाळाला जन्म दिला आहे. ठाकरे घराण्यात नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे.
आजोबा झाल्याची माहिती मिळताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वत: ब्रीच कँन्डी रुग्णालयात दाखल झाले आहेत. तसेच त्यांचे इतर कुटुंबियही रुग्णालयात दाखल झाले आहेत. नव्या पाहुण्याचं आगमन झाल्याने ठाकरे कुटुंबामध्ये आनंदाचं वातवरण पाहायला मिळतंय. त्यामुळे राज ठाकरे आता आजोबाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.
कोण आहेत अमित ठाकरे यांच्या पत्नी….?
27 जानेवारी 2019 रोजी अमित ठाकरे आणि मिताली बोरूडे यांचा विवाह झाला. लोअर पर सेंट रेजिस हॉटेलमध्ये त्यांचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला. अमित ठाकरे यांच्या पत्नी मिताली बोरूडे या फॅशन डिझायनर आहेत. मिताली यांनी फॅड इंटरनॅशनलमधून फॅशन डिझायनिंगचं शिक्षण घेतलं आहे. काही वर्षांपूर्वी मिताली आणि राज ठाकरे यांच्या कन्या उर्वशी ठाकरे यांनी ‘द रॅक’ हा कपड्यांचा ब्रँड लाँच केला.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…