उपग्रहाचे जळलेले तुकडे लाडबोरी मध्ये पडले ; अभ्यासक्रमांनी केली पाहणी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
चंद्रपूर :- काल रात्री अचानक आकाशात उल्कापात झाल्याचे दिसून आले. यातील काही भाग हे सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी या गावात पडल्याचे उघड झाले. मात्र हा कुठला उल्कापात नसून उपग्रहाचे तुकडे असल्याचे समोर आले आहे.
या ठिकाणी खगोलीय अभ्यासकांची टीम पोचली असून त्यांच्याकडून ह्या तुकड्यांचे संकलन केले जात आहे.
काल रात्री सिंदवाही तालुक्यातील लाडबोरी या गावाच्या परिसरात लोकांनी जोराचा आवाज ऐकला. पुढे हा आवाज एखाद्या विमानासारखा झाला. मात्र त्यानंतर एखादा मोठा स्फोट झाल्याचे गावकऱ्यांनी ऐकले. वास्तविक उपग्रहाचे तुकडे या ठिकाणी जळून पडले होते. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.यामध्ये एक जळालेली रिंग आणि एक गोल वस्तूचा समावेश आहे.एक मोठी रिंग एका बांधकाम सुरू असलेल्या प्लॉटवर पडली. तीचा आकार साधारण दहा बाय असुन, जाडी आठ ते दहा इंच असून वजन 40 किलो आहे.

उपग्रहाचे तुकडे
खगोलीय अभ्यासकांनुसार न्यूझीलंड येथील माहीया द्वीपकल्पावरुन भारतीय वेळेनुसार सायंकाळी ६:११ वाजता तेथील राॅकेट लॅब कंपनीच्या इलेक्ट्रॉन राॅकेट द्वारे ब्लॅकस्काय नावाचा उपग्रह पृथ्वीच्या ४३० किमी उंचीवर नेऊन स्थिरावण्यात आला.आपल्या भागात साधारण तीस ते पस्तीस किमी उंचीवरून बुस्टर वातावरणाशी घर्षण झाल्याने एकामागोमाग एक असे ते जळत गेले. आज या ठिकाणी खगोलीय अभ्यासकांची टीम पोचली त्यांनी जळालेल्या उपग्रहाच्या तुकड्यांचे संकलन केले आहे. उपग्रह सोडताना त्याच्या मागचा भाग पृथ्वीच्या कक्षात येऊन पडल्याची शक्यता आहे प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…