यूपीए च्या अध्यक्षपदावर शरद पवारांनी सोडलं मौन ; तीन शब्दात उत्तर दिलं….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला सपाटून मार खावा लागल्यानंतर पक्षांतर्गत बदलाचे वारे वाहू लागते. यूपीएला नव्या चेहऱ्याची गरज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या.
काँग्रेसमध्येही यासाठी धूसफूस सुरू झाली. यावर राहूल गांधींपासून यूपीएतील अनेक पक्षांनी भाष्य केलं. शरद पवारांना यूपीएचं अध्यपद देण्याची मागणी काहींनी केली.
राष्ट्रवादीच्या युवक काँग्रेसने यासंदर्भात ठराव देखील आणला. मात्र पवारांनी अनेक दिवसांपासून यावर मौन बाळगलं होतं. अखेर आज कोल्हापुरात शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन यावर स्पष्टीकरण दिलंय.
मोदी आणि भाजपला शह देणारा कोणताही प्रबळ असा दावेदार आणि विरोधी पक्षच सध्या अस्तित्वात नसल्यामुळे विरोधकांच्या आघाडीबाबतची चर्चा सातत्याने डोकं वर काढताना दिसते. यूपीएचं नेतृत्व गांधी कुटुंबियांशिवाय अथवा काँग्रेसव्यतिरिक्त कुणीतरी करावं अथवा काँग्रेसशिवायच्या तिसऱ्या आघाडीच्या चर्चाही सातत्याने होता दिसतात. दुसरीकडे ममता बॅनर्जी मोदींना टक्कर देऊ शकतील, अशाही चर्चा डोकं वर काढताना दिसतात.
या संपूर्ण प्रकरणावर आता शरद पवार यांनीच मौन सोडलं आहे. मधल्या काळात आमच्या तरुणांनी ठराव केला की मी यूपीएचं अध्यक्षपद घ्यावं. पण मला या ‘यत्किंचीत रस नाही’, असं उत्तर शरद पवार यांनी दिलं आहे. मी यात पडणार नाही. ही जबाबदारी मी घेणार नाही, असं पवार यांनी स्पष्ट केलं. मात्र, सत्ताधाऱ्यांविरोधात कोणी एकत्र येऊन पर्याय देण्याचा विचार कोणी करत असेल, तर त्यांना सहकार्य शक्ती पाठिंबा आणि मदत देण्याची माझी तयारी आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं.
वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. सध्या ममता बॅनर्जी यांची मोठी शक्ती आहे. पण काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे जो राज्यात प्रत्येक ठिकाणी कमी अधिक आहे. जे पक्ष व्यापक आहेत. त्यांना घेऊन विस्तार करणं हे जास्त महत्वाचं आहे, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…