मोठी बातमी ; आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदारांच्या मृत्यू….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबीनं मोठा छापा टाकला होता. या छाप्यात अनेक मोठमोठ्या व्यक्तींना ताब्यात घेतलं होतं. यातच शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानलाही (Aryan Khan) ताब्यात घेण्यात आलं होतं.
याप्रकरणात 28 ऑक्टोबर रोजी आर्यनची जामिनावर सुटका करण्यात आली. अशातच आता याप्रकरणी आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.
कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे पंच साक्षीदार प्रभाकर साईल यांचा मृत्यू झाला आहे. हृदयविकाराचा झटका आल्यामुळे साईल यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती समोर आली आहे.
किरण गोसावीचा बाॅडीगार्ड प्रभाकर साईल यांनी किरणने आर्यन खान प्रकरण दाबण्यासाठी 18 कोटी रुपयांची डील केल्याचा एक व्हिडीओ व्हायरल केला होता. त्यानंतर सर्वत्र एकत्र खळबळ उडाली होती. अशातच त्यांच्या मृत्यूनंही चांगलीच खळबळ उडाली आहे.
आज सकाळी 11 वाजता प्रभाकर साईलचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी अंधेरी येथील त्याच्या घरी आणलं जाईल. तिथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…