अमरावती पोलीस आयुक्तांना तुरुंगात टाकणारच :- आमदार राणा आक्रमक…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अमरावती :- खासदार नवनीत राणा यांनी दाखल केलेल्या हक्कभंगाच्या तक्रारीची संसदीय विशेषाधिकार समितीकडून दखल घेण्यात आली आहे. समितीने पोलिस महासंचालक, मुंबईचे पोलिस आयुक्त, अमरावतीचे पोलिस आयुक्त तसेच उपायुक्तांना येत्या ६ एप्रिलला दिल्लीत पाचारण केले आहे.
दरम्यान, वेळ पडल्यास ईडी किंवा सीबीआयकडे जाणार पण पोलिस आयुक्त आरती सिंह यांना तुरुंगात टाकणार असं वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळं पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.
ते म्हणाले, आरती सिंह यांनी भ्रष्टाचार केला. खोटे गुन्हे दाखल केलेत असा आरोपही त्यांनी केला आहे. आरती सिंह यांनी पैसे घेऊन गुन्हेगारांशी सेटलमेंट त्या करत आहेत. या आधी त्यांनी ज्या-ज्या ठिकाणी काम केलं आहे. अमरावतीत त्यांनी भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. अनेक ठिकाणी असाच भ्रष्टाचार केला आहे. माझ्यावर आणि माझ्या कार्यकर्त्यांवर जो गुन्हा दाखल करायचा आहे तो दाखल करा, त्याला उत्तर मी देईन. अमरावती जिल्ह्यामध्ये जो काही भ्रष्टाचार सुरू आहे, त्या विरोधात मी पंतप्रधान, गृहमंत्री सर्वोच्च न्यायालय तसेच ईडी किंवा सीबीआयकडे जाईन पण आरती सिंह यांना तुरुंगात टाकणारच, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला आहे.
दरम्यान, खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन केले होते. त्यानंतर त्यांनी मुंबईत मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यावेळी पोलिसांनी खासदार व आमदारांना स्थानबद्ध केले होते. स्थानबद्ध केल्यानंतर आपल्याला आरोपीसारखी वागणूक देण्यात आली असा खासदार नवनीत राणा यांचा आरोप आहे. त्यांनी या संदर्भात संसदेच्या विशेषाधिकार समितीकडे तक्रार केली. त्या अनुषंगाने समितीच्या उपसचिवांनी यांनी २९ मार्च रोजी या चार अधिकाऱ्यांना पत्र पाठवून समितीसमोर हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…