संजय राऊतांनसह ७२ खासदार निवृत्त होतायत ; राज्यसभेत निरोप समारंभाला सुरुवात….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- पाच राज्यांच्या मिनी लोकसभा निवडणुका संपताच राज्यसभेमध्ये मोठ्या प्रमाणावर जागा रिकाम्या होणार आहेत. जवळपास ७२ राज्यसभा खासदार निवृत्त होणार आहेत.
यापैकी अनेकांना पुन्हा सदस्य होता येणार नाही, तर काहीजण पुन्हा सदस्य होऊ शकतात. त्या त्या राज्यातील कोट्यानुसार, राजकीय परिस्थितीनुसार या जागा जिंकल्या जाणार आहेत.
आज राज्यसभेत या सदस्यांचे काम आणि योगदानावर चर्चा करण्यात आली. सभापती व्यंकय्या नायडू यांनी अनेक सदस्यांचे नाव घेत त्यांच्या कामाची प्रशंसा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या सदस्यांना आज निरोप देणार आहेत. आज राज्यसभेत शून्य प्रहर किंवा प्रश्नकाळ होणार नाही, यामुळे विविध पक्षांचे नेते, सदस्य या निरोप समारंभात बोलू शकणार आहेत.
एप्रिलमध्ये निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये आनंद शर्मा, ए. के अँटनी, सुबमण्यम स्वामी, मेरी कोम आणि स्वप्न दासगुप्ता यांचा समावेश आहे. तर जूनमध्ये अर्थ मंत्री निर्मला सीतारमण, सुरेश प्रभू, एम जे अकबर, जयराम रमेश, विवेक तन्खा, वी विजयसाई रेड्डी यांचा कार्यकाळ संपत आहे.

जुलैमध्ये पीयूष गोयल, मुख्तार अब्बास नकवी, पी. चिदंबरम, अंबिका सोनी, कपिल सिब्बल, सतीश चंद्र मिश्रा, संजय राउत, प्रफुल्ल पटेल आणि के. जे अल्फोंस हे सेवा निवृत्त होत आहेत. यापैकी भाजपा आणि काँग्रेसचे काही सदस्यांना पुन्हा संधी मिळेल की नाही याबाबत काहीही सांगता येत नाहीय. यापैकी काही सदस्य हे काँग्रेसच्या जी -२३ मधील आहेत. यामुळे सारेकाही राजकीय परिस्थितीवर अवलंबून आहे.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…