राज्यात भाजपचे “मिशन 2024” सुरु ; स्वबळावर निवडणुक लढविणार…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- देशात दोन वर्षानंतर 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यादृष्टीने भाजपने आतापासूनच तयारी सुरू केली असून राज्यात ‘मिशन 2024′ सुरु करण्यात आले आहे. भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडली.
या बैठकीत मिशन 2024 च्या दृष्टीने निर्णय घेण्यात आले आहेत. प्रत्येक प्रमुख नेत्याकडे लोकसभेच्या दोन मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
राज्यात कॉंग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र असल्याने आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी भाजपने केली आहे. 288 विधानसभा आणि 48 लोकसभा मतदार संघ स्वबळावर लढण्यासाठी भाजप तयारीला लागला आहे. मतदार संघातील पक्षबांधणीपासून, सदस्य नोंदणी तर दुसरीकडे सरकारला कोंडीत पकडण्यासाठी प्रत्येक विषयावर भाजप लक्ष केंद्रीत करणार आहे.
याशिवाय, प्रत्येक नेत्याकडे 2 लोकसभा मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली असून त्यामध्ये येणाऱ्या सर्व विधानसभेची जबाबदारी देण्यात आली आहे. 14 नेत्यांकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हे नेते संपूर्ण राज्यभर दौरा आणि संघटनाबांधणी करणार आहेत. भाजप संघटनमंत्री श्रीकांत भारती या सर्व दौऱ्याचं समन्वय करणार आहेत.
कोणाकडे कोणते मतदारसंघ…?
देवेंद्र फडणवीस – सोलापूर, अहमदनगर,
चंद्रकांत पाटील – ठाणे ग्रामीण आणि नाशिक
सुधीर मुंनगंटीवार – बीड, जालना
पंकजा मुंडे – कोल्हापूर, सांगली
आशिष शेलार – रत्नागिरी, सिंधुदुर्ग
श्रीकांत भारतीय – नांदेड, परभणी
चंद्रशेखर बावनकुळे – अकोला, अमरावती
प्रविण दरेकर – पालघर, मिरा भाईंदर
गिरीष महाजन – उस्मानाबाद, हिंगोली
संजय कुटे – दक्षिण रायगड,उत्तर रायगड
रविंद्र चव्हाण – सातारा, पुणे ग्रामीण
रावसाहेब दानवे – बुलढाणा, नंदूरबार
संभाजी पाटील निलंगेकर – गोंदिया, भंडारा

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…