अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला ; सीसीटीवी कॅमेरे , सिक्योरिटी बॅरिकेडची केली तोड़फोड़ ; गेटवर लाल रंग लावला ; मनीष सिसोदियांचा भाजपवर केला आरोप..…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला झाल्याची बातमी समोर आली आहे.
उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली. ‘काही समाजकंटकांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या घरावर हल्ला केला आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह बॅरीकेडची तोडलेफोड केली,’ अशी माहिती सिसोदिया यांनी दिली.

भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला करुन तोडफोड केल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. अरविंद केजरीवाल यांनी काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडाची खिल्ली उडवली असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. त्याविरोधात भाजपकडून केजरीवालांविरोधात निदर्शने सुरू होते. मनीष सिसोदिया यांनी भाजपवर या हल्ल्याचा आरोप लावला आहे. ‘भाजपच्या गुंडांनी अरविंद केजरीवाल यांच्या घराची तोडफोड केली. भाजपच्या पोलिसांनी त्यांना थांबवण्याऐवजी दारापर्यंत आणले’, असा आरोपही सिसोदिया यांनी केला आहे.

गेटवर लाल रंग लावला…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप युवा मोर्चाच्या सुमारे 150-200 कार्यकर्त्यांनी सकाळी 11.30 वाजता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने सुरू केली. द काश्मीर फाइल्स चित्रपटाबाबत विधानसभेत केजरीवाल यांच्या विधानाविरोधात हे निदर्शने करण्यात येत होती.1 वाजण्याच्या सुमारास काही आंदोलक बॅरिकेड तोडून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर पोहोचले. त्यांनी दरवाजावर रंगरंगोटी केली आणि येथे लावलेले सीसीटीव्ही कॅमेरेही फोडले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून 70 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…