“अजित पवारांचं घोटाळा सिद्ध झालाय , माझी भारत सरकारला विनंती आहे कि”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- गेल्या काही दिवसांपासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांकडून कारवाई करण्यात येत आहे. महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर ईडीने कारवाई करण्यात आली आहे.
भाजप नेते किरीट सोमय्यांनी राज्य सरकारमधील मंत्र्यांवर थेट आरोप करतात. त्यातच आता किरीट सोमय्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासंदर्भात माहिती दिली आहे.
अजित पवारांनी केलेला 1200 कोटींचा जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना घोटाळा सिद्ध झालेला आहे. ईडीने या कारखान्याची प्रॉपर्टी अटॅच केली होती. न्यायालयाने त्याला मान्यता दिलेली आहे. माझी भारत सरकार आणि ईडीला विनंती आहे की, हा कारखाना पुन्हा 27 हजार शेतकऱ्यांच्या ताब्यात द्यावा, असं किरीट सोमय्या म्हणाले आहेत.
ईडीने काही दिवसांपूर्वी जरंडेश्वर कारखाना सील केला होता. तसेच जरंडेश्वर कारखान्यासंबंधित 1200 कोटी रूपयांची संपत्ती जप्त केली होती. सदर कारखाना अजित पवारांच्या नातेवाईकांच्या खासगी मालकीचा असून जरंडेश्वर शुगर या नावाने चालवला जातो. न्यायालयाच्या मान्यतेमुळे अजित पवारांच्या अडचणीत वाढ झाल्याची चर्चा आहे.
दरम्यान, जरंडेश्वर कारखाना लिलावावेळी कमी किंमतीत घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. हे प्रकरण न्यायालयात गेले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार कारखान्याची ईडी चौकशी करण्यात आली. तसेच किरीट सोमय्यांनी जरंडेश्वर कारखान्याच्या व्यवहारासंदर्भातील कागदपत्रे 21 ऑक्टोबर 2021 रोजी ईडीसमोर सादर केली होती.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…