मुख्यमंत्र्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही :- फडणवीसांनी घेतलं हलक्यात….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
शिर्डी :- भ्रष्टाचारासंदर्भातील सत्य नाकारता येत नाही व त्यावर उत्तरही देता येत नसल्याने मुख्यमंत्र्यांनी भावनिक भाषणाचा आधार घेतला. मुख्यमंत्री जे बोलले ते फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही.
आम्ही २०२४ च्या तयारीत आहोत आणि कुठल्याही परिस्थितीत स्वबळावर आम्ही सरकार स्थापन करू, असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
साई दर्शनासाठी आलेल्या फडणवीस यांनी शनिवारी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, आम्ही भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे पुराव्यानिशी मांडली. कोविड काळात मुंबई महापालिकेत कशी लूट झाली याची उदाहरणे दिली. त्याचे कोणतेच उत्तर सत्ताधारी पक्ष किंवा मुख्यमंत्र्यांकडे नव्हते. त्यामुळे त्यांनी भावनिक भाषणाचा आधार घेतला. भाजपा नेते किरीट सोमय्या स्वत: हातोडा घेऊन निघाल्याप्रकरणी प्रश्न विचारला असता, फडणवीस म्हणाले, ते प्रातिनिधिक स्वरूपात हातोडा घेऊन निघाले. प्रत्यक्षात कारवाई संबंधित संस्था किंवा न्यायालयच करणार आहे. आमची भूमिका संघर्षाची आहे. आम्ही कुठेही, कुठल्याही कारवाईने दबणार नाही. कुणालाही कुणाच्याही कुटुंबापर्यंत जायचे नाही. कोणतीही एजन्सी कोण कोणाचा नातेवाईक आहे हे बघून कारवाई करीत नाही. तथ्याच्या आधारावरच कारवाई होते, असेही फडणवीस म्हणाले. साई दर्शनानंतर फडणवीस यांचा संस्थानच्या वतीने सीईओ भाग्यश्री बानायत व विश्वस्त जयंत जाधव यांनी सत्कार केला.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…