संजय राऊतांनी शिवसेनेची वाट लावली ; चंद्रकांत पाटील यांच्या हल्लाबोल…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महाविकास आघाडी सरकार आहे की दगड, चंद्रकांत पाटीलांचा खोचक सवाल
आम्ही समाजाचे शोषण किंवा भ्रष्टाचार करुन घरं उभी केलेली नाहीत. केंद्रीय यंत्रणाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयावरही आता सत्ताधाऱ्यांचा आक्षेप सुरु आहेत.
त्यामुळे आता बाबासाहेबांनी लिहलेल्या घटनेवरही तुमचा विश्वास नाही का?, असा सवाल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केला आहे. हे सर्व पाहता खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेची वाट लावली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हतबल होऊन हे पाहत आहेत, हे दुर्दैवी असल्याचा पलटवार पाटील यांनी केला आहे.
केंद्रीय तपास यंत्रणा आणि महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते यांची हातमिळवणी आहे. भाजपला महाराष्ट्रातील सरकार चालू द्यायचं नाही. त्यांना सरकार उद्धवस्त करायचं आहे, असं वक्तव्य राऊत यांनी केलं होत. त्यावर आता चंद्रकांत पाटील यांनी प्रतित्युर दिलं आहे. ते म्हणाले, शिवेसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवेसेनीची वाट लावण्याचे कंत्राट घेतले आहे. एकही नेता त्यांनी सेनेत टिकू दिला नाही. सेनेतील दिग्गज नेते आज कुठे आहेत कुणाला माहिती नाही. आणि हे सर्व मुख्यमंत्री हतबल होऊन पाहतं आहेत हे दुर्दैव आहे, असेही ते म्हणाले आहेत.
एसटी कर्मचारी संपाविषयी ते म्हणाले, एसटीचा संप मिटला नाही तर एक लाख घरे उद्ध्वस्त होतील. या संपामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. अजित पवारांनी सगळे श्रेय घ्यावे, पण हा संप मिटवावा असे आवाहन त्यांनी केलं आहे. रेकॉर्ड ब्रेक करणारा हा एसटी संप असल्यानं काही निर्णय घेतला तर आमदार पळून जातील अशी महाविकास आघाडीला भीती आहे त्यामुळे ते कोणताही ठोस निर्णय किंवा भूमिका घेत नसल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे…

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…